Lokmat Agro >शेतशिवार > Orange Crop Management : संत्रा फळ बागेचे कसे व्यवस्थापन करावे? जाणून घ्या सविस्तर

Orange Crop Management : संत्रा फळ बागेचे कसे व्यवस्थापन करावे? जाणून घ्या सविस्तर

Management of orange orchards | Orange Crop Management : संत्रा फळ बागेचे कसे व्यवस्थापन करावे? जाणून घ्या सविस्तर

Orange Crop Management : संत्रा फळ बागेचे कसे व्यवस्थापन करावे? जाणून घ्या सविस्तर

Orange Crop Management : सतत पाऊस सुरु असल्याने संकटात सापडलेल्या संत्रबाग शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञांनी काय सल्ला दिलाय तो पाहूया. 

Orange Crop Management : सतत पाऊस सुरु असल्याने संकटात सापडलेल्या संत्रबाग शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञांनी काय सल्ला दिलाय तो पाहूया. 

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News : महिनाभरापासून सुरु असलेली पावसाची रिपरिप, यादरम्यान ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव, शेतात साचलेले पाणी यामुळे कीड व रोगाचा प्रादूर्भाव होऊन संत्राच्या आंबिया बहराची फळगळ होत आहे. भाव नसल्याने आधिच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना कोटींचा फटका बसत आहे. त्यामुळे संत्रा फळ बागेचे कसे व्यवस्थापन करावे ही चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. कृषी शास्त्रज्ञांनी दिलेल्या सल्ला नुसार बाग राखण्यास मदत मिळणार आहे. 

प्रतिकूल परिस्थितीसह वनस्पतीशास्त्रीय कारणांमूळे ७० ते ८३ टक्के, रोगामुळे ८ ते १० टक्के तर कीटकांमूळे ८ ते १८ टक्के फळगळ होत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले.  सध्या पूर्णवाढ झालेल्या - अपरिपक्व संत्रा फळांची गळ होत असल्याचे दिसून येते. संजिवकांचा असमतोल, नत्रांची व अन्नद्रव्याची कमतरता, कर्बोदके, किड व रोगांच्या प्रादूर्भावामुळे ही फळगळ होत असल्याचे समोर आले आहे.

सततच्या पावसाने मुळे कुजतात व त्यांना प्राणवायू कमी मिळतो, शिवाय अपुरे पोषण, संजिवकाच्या अभावामुळे पेशीक्षय होऊन फळगळ होण्याची शक्यता आहे. कर्बोदकाच्या अभावामुळे पाने, फुले व फळे यांच्यात पेशीक्षय होऊन फळगळ होण्याची शक्यता असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

ही करा उपाययोजना

• बगिच्यात पाणी साचू देऊ नका. उताराला आडवे दोन ओळीनंतर चर काढा. सुक्ष्म अन्नद्रव्य झिंक सल्फेट ५ ग्रॅम, फेरस सल्फेट १ ग्रॅम, बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.
• आंतरिक फळगळीसाठी एनएए १ ग्रॅम (१० पीपीएम), किंवा २.४ डी १.५ ग्रॅम (१५पीपीएम) किंवा जिब्रेलिक अॅसीड १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) अधिक युरिया १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 
आंबिया बहरचे ३५ हजार हेक्टर क्षेत्र
 

अमरावती             ९०८ हेक्टर
भातकुली              ३३ हेक्टर
चांदूर रेल्वे           ८८२ हेक्टर
धामणगाव           ३६२ हेक्टर
मोर्शी                 ३६९५ हेक्टर
वरुड               ८७८४ हेक्टर
चांदूरबाजार     ४८३२ हेक्टर
तिवसा             १९७१ हेक्टर
अचलपूर         ९८६४हेक्टर
अंजनगाव         ३०२० हेक्टर 
दर्यापूर                 ५ हेक्टर
मेळघाट             २२ हेक्टर


 

Web Title: Management of orange orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.