महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०२४-२५ या वर्षात पुणे जिल्ह्यात १ हजार ३०८ हेक्टर फळबाग लागवड झाली आहे. आंबा, केळी व काजू या पिकांची लागवड तुलनेत अधिक असून, शेतकऱ्यांना शासनाकडून मिळते.
अनुदान फळबागांबाबत शेतकऱ्यांत होत असलेली जागरूकता उत्पन्न वाढीसाठी चांगले संकेत आहेत. सर्वाधिक लागवड पुरंदर तालुक्यात १९७ हेक्टरवर झाली आहे.
राज्यात फळबाग योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन फळ पिके व फूल पिके यांचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत समावेश केला आहे.
या योजनेंतर्गत वैयक्तिक बांधावर, सलग शेतावर व पडिक जमिनीवर फळझाड व फूलपीक लागवड करता येते. सकल फळबाग लागवडीअंतर्गत वैयक्तिक लाभार्थीला आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, लिंबू, संत्री आदी फळपिकांची लागवड करता येते.
असे मिळते अनुदान...
फळबागेची लागवड केल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती वृक्ष पिकांबाबत जे लाभार्थी कमीत कमी २० टक्के आणि कोरडवाहू वृक्ष पिकांबाबत किमान ७५ टक्के झाडे रोपे जिवंत ठेवतील, अशाच लाभार्थीना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील. या योजनेचे चांगले फलित ग्रामीण भागात दिसून येत आहेत.
यांना मिळतो लाभ...
'मनरेगा'मधून तालुकानिहाय कमीत कमी ०.०५ हे. व फळबाग लागवड जास्तीत जास्त २.०० हे. प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा राहील. इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास व ७/१२ च्या उताऱ्यावर कुळाचे नाव असेल, तर योजना राबवत असताना कुळाची संमती आवश्यक आहे. अन्यथा या योजनेचा लाभदेताना अडचणी येतात.
तालुकानिहाय फळबाग
तालुका | क्षेत्र (हे.) |
भोर | ५७ |
वेल्हा | ४९.२३ |
मुळशी | ७५.०९ |
मावळ | ८०.७५ |
हवेली | २६.७५ |
खेड | ११०.९९ |
आंबेगाव | १११ |
जुन्नर | १३१.८३ |
शिरूर | ९९.५५ |
बारामती | १०६.१५ |
इंदापूर | ११९.५ |
दौंड | १४३.३५ |
पुरंदर | १९७ |
एकूण | १३०८.२ |
आवश्यक कागदपत्रे
लाभार्थ्यांचे नाव असलेले रोहयो योजनेचे जॉब कार्ड, शेतीचा ७/१२, ८-अ, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत.