Join us

आंबा, केळी व काजूचे होणार हब; राज्याच्या 'या' जिल्ह्यात फळबाग लागवड वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 13:37 IST

Falbag Lagwad : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०२४-२५ या वर्षात पुणे जिल्ह्यात १ हजार ३०८ हेक्टर फळबाग लागवड झाली आहे. आंबा, केळी व काजू या पिकांची लागवड तुलनेत अधिक असून, शेतकऱ्यांना शासनाकडून मिळते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०२४-२५ या वर्षात पुणे जिल्ह्यात १ हजार ३०८ हेक्टर फळबाग लागवड झाली आहे. आंबा, केळी व काजू या पिकांची लागवड तुलनेत अधिक असून, शेतकऱ्यांना शासनाकडून मिळते.

अनुदान फळबागांबाबत शेतकऱ्यांत होत असलेली जागरूकता उत्पन्न वाढीसाठी चांगले संकेत आहेत. सर्वाधिक लागवड पुरंदर तालुक्यात १९७ हेक्टरवर झाली आहे.

राज्यात फळबाग योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन फळ पिके व फूल पिके यांचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत समावेश केला आहे.

या योजनेंतर्गत वैयक्तिक बांधावर, सलग शेतावर व पडिक जमिनीवर फळझाड व फूलपीक लागवड करता येते. सकल फळबाग लागवडीअंतर्गत वैयक्तिक लाभार्थीला आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, लिंबू, संत्री आदी फळपिकांची लागवड करता येते.

असे मिळते अनुदान...

फळबागेची लागवड केल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती वृक्ष पिकांबाबत जे लाभार्थी कमीत कमी २० टक्के आणि कोरडवाहू वृक्ष पिकांबाबत किमान ७५ टक्के झाडे रोपे जिवंत ठेवतील, अशाच लाभार्थीना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील. या योजनेचे चांगले फलित ग्रामीण भागात दिसून येत आहेत.

यांना मिळतो लाभ...

'मनरेगा'मधून तालुकानिहाय कमीत कमी ०.०५ हे. व फळबाग लागवड जास्तीत जास्त २.०० हे. प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा राहील. इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास व ७/१२ च्या उताऱ्यावर कुळाचे नाव असेल, तर योजना राबवत असताना कुळाची संमती आवश्यक आहे. अन्यथा या योजनेचा लाभदेताना अडचणी येतात.

तालुकानिहाय फळबाग

तालुकाक्षेत्र (हे.)
भोर५७
वेल्हा४९.२३
मुळशी७५.०९
मावळ८०.७५
हवेली२६.७५
खेड११०.९९
आंबेगाव१११
जुन्नर१३१.८३
शिरूर९९.५५
बारामती१०६.१५
इंदापूर११९.५
दौंड१४३.३५
पुरंदर१९७
एकूण१३०८.२

आवश्यक कागदपत्रे

लाभार्थ्यांचे नाव असलेले रोहयो योजनेचे जॉब कार्ड, शेतीचा ७/१२, ८-अ, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत.

हेही वाचा : Success Story : शेतकरी ते विक्रेता धोरणाने समृद्धीची वाट; पपईच्या थेट विक्रीतून मिळविला आधिक लाभ

टॅग्स :फलोत्पादनपुणेशेती क्षेत्रशेतकरीशेतीकृषी योजना