Join us

Mango Crop: अतिधन पद्धतीने आंब्याचे मिळणार चांगले उत्पादन कसे ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:01 IST

Mango Crop : शेतकरी लक्ष्मणराव कवडे या शेतकऱ्यानी केशर आणि दशेरी आंब्याची शेती करून इतर शेतकऱ्यांना उत्पादनाची नवी दिशाच दाखवली आहे. त्यांनी अतिघन पध्दतीने आंब्याची लागवड केली आहे. वाचा सविस्तर

युनूस नदाफ

पार्डी : अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील शेतकरी लक्ष्मणराव कवडे या शेतकऱ्यानी केशर आणि दशेरी आंब्याची (Mango) शेती करून इतर शेतकऱ्यांना (farmer)उत्पादनाची नवी दिशाच दाखवली आहे.

अर्धापूर तालुका इसापूर धरणाच्या लाभक्षेत्रात येत असल्याने संपूर्ण तालुका हा बागायत क्षेत्रात मोडला जातो. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळी, ऊस, हळद, फुलशेती आणि भाजीपाला पिकाचे उत्पन्न घेतात. परंतु लक्ष्मणराव कवडे यांनी आपल्या शेतात नवीन प्रयोग केला आहे.

दीड एकरामध्ये ८ वर्षांपूर्वी ४ बाय १० अंतरावर पंधराशे झाडाची लागवड केली आहे. मागील ४ वर्षांमध्ये केशर व दशेरी आंब्याच्या शेतीमध्ये मागील ४ वर्षात अंतर्गत म्हणून कलिंगड, पत्ता गोबी, फूलगोबी व झेंडूचे उत्पादन काढले आहे. आंब्याच्या अंतर्गत पिके घेऊन भरघोस उत्पन्न काढले आहे.

मागील ३ वर्षापासून आंब्याच्या झाडांची उंची वाढल्यामुळे अंतर्गत पीक घेण्यास बंद केले आहे. मात्र यावर्षी आंबा बहरलेला असून व्यापाऱ्यांनी ८ लाखाला खरेदी केले आहे.

मागील काही वर्षात कोणत्या न कोणत्या कारणामुळे आंब्याच्या मोहराची गळती होत होती. परंतु यंदा आंब्यासाठी मोहराला अनुकूल असल्याने आंब्याच्या झाडाला मोठ्या प्रमाणात मोहर लागला आहे. यामुळे यंदा आंब्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी ४०० कॅरेट उत्पन्न झाले होते.

लक्ष्मणराव कवडे यांनी इस्राईल शेती पद्धतीने म्हणजे अतिधन पद्धतीने लागवड करून यांत्रिकीकरण तसेच झाडांच्या फांद्यांची छाटणी, खत - पाणी व्यवस्थापन रोग व किडीचे एकात्मिक नियंत्रण केले आहे. पारंपारिक पद्धतीपेक्षा पीक पद्धत बदलून केशर व दशेरी आंब्याचे उत्पादन घेत आहेत.

पारंपारिक शेती न करता आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकाची लागवड केल्यास चांगले उत्पादन होते.  - लक्ष्मणराव कवडे, शेतकरी

हे ही वाचा सविस्तर : Soybean Procurement: ४ लाख क्विंटलवर सोयाबीन खरेदी केंद्रांतच काय आहे कारण वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रआंबाशेतकरीशेतीतंत्रज्ञान