रत्नागिरी: अविट गोडी, मधुर स्वादामुळे रत्नागिरी हापूसला देशविदेशातून वाढती मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ६६ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड असून, हेक्टरी दोन टन आंबा उत्पादन क्षमता आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आंबा मुंबईला विक्रीसाठी पाठवितात. त्यापैकी ६० टक्के आंब्याची मुंबईतून परदेशात निर्यात होते. जिल्ह्यातील काही बागायतदार मँगोनेटच्या माध्यमातून थेट निर्यात करतात.
आंबा निर्जंतुकीकरण केले जाते. रत्नागिरी निर्यातीपूर्वी पणन मंडळाकडे ही सुविधा उपलब्ध आहे. उष्णजल, विकीकरण प्रक्रिया, वाशी (नवी मुंबई), लासलगाव (नाशिक) येथे होते. प्रक्रियेनंतर आंबा व्यवस्थित पॅकिंग केल्यानंतर निर्यात केली जाते.
प्रत्येक देशाच्या निकषाप्रमाणे उष्णजल, विकिरण प्रक्रिया आवश्यक आहे. आंबा नाशवंत असल्यामुळे सर्वाधिक विमानातून निर्यात केली जाते. रत्नागिरीतून थेट आंबा निर्यात करणाऱ्यांची संख्या मोजकीच आहे. वाशी मार्केटमधून सर्वाधिक आंबा निर्यातीसाठी पाठविला जात आहे.
आंब्याची निर्यात २५ हजार टनांवररत्नागिरी जिल्ह्यातून बहुतांश आंबा वाशी मार्केटला विक्रीसाठी पाठविला जातो. तेथून परदेशात आंबा निर्यात केली जाते. दरवर्षी २० ते २५ हजार टन आंब्याची निर्यात करण्यात येते. कोरोना काळातही २० हजार मेट्रीक टन आंब्याची निर्यात करण्यात आली होती. आंबा निर्यातीमुळे दर चांगला मिळतो व शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होत आहे.
या देशांत केली जाते निर्यातजपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जर्मनी, हाँगकाँग, इटली, नेदरलॅण्ड, सिंगापूर, स्विर्झलंड, इंग्लंड, आखाती प्रदेशात आंबा निर्यात करण्यात येते. परदेशातून आंब्याला वाढती मागणी आहे.
जे शेतकरी आंबा निर्यातीसाठी इच्छुक असतात, त्या आंब्याची तपासणी पणन मंडळाच्या केंद्रात संबंधित देशाचे निरीक्षक करतात. त्यांनी अनुकूलता दर्शवल्यानंतरच संबंधित देशाच्या निकषानुसार आंब्यावर प्रक्रिया करून पेंकिग केले जाते. नंतरच जल/हवाईमार्गे आंबा परदेशात निर्यात केला जातो. - जालिंदर पांगरे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी