Lokmat Agro >शेतशिवार > एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आंबा निर्यात सुरू होणार; यंदा कोणत्या देशात किती निर्यात?

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आंबा निर्यात सुरू होणार; यंदा कोणत्या देशात किती निर्यात?

Mango exports will start from the first week of April; How much will be exported to which countries this year? | एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आंबा निर्यात सुरू होणार; यंदा कोणत्या देशात किती निर्यात?

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आंबा निर्यात सुरू होणार; यंदा कोणत्या देशात किती निर्यात?

Mango Export from Maharashtra गेली दाेन वर्षे महाराष्ट्रातून आंबा निर्यात करण्यात येत आहे. सन २०२३-२४ मध्ये २५ हजार मेट्रिक टन आंबा परदेशात पाठविण्यात आला होता.

Mango Export from Maharashtra गेली दाेन वर्षे महाराष्ट्रातून आंबा निर्यात करण्यात येत आहे. सन २०२३-२४ मध्ये २५ हजार मेट्रिक टन आंबा परदेशात पाठविण्यात आला होता.

शेअर :

Join us
Join usNext

रत्नागिरी : गेली दाेन वर्षे महाराष्ट्रातून आंबा निर्यात करण्यात येत आहे. सन २०२३-२४ मध्ये २५ हजार मेट्रिक टन आंबा परदेशात पाठविण्यात आला होता.

तर २०२४-२५ या हंगामात राज्यातून १९,८०० मेट्रिक टन एवढा आंबा निर्यात करण्यात आला आहे. यावर्षी आंबा हंगाम सुरू झाला असला तरी प्रमाण अल्प असल्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आंबा निर्यात सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारताने सन २०२३-२४ मध्ये ३२,१०४ मेट्रिक टन आंबा निर्यात केला होता, त्याची किंमत ४९,५४६ लाख एवढी होती. यापैकी महाराष्ट्रातून ४१,५३१ लाखाचा २५,२३० मेट्रिक टन आंबा निर्यात करण्यात आला हाेता.

सन २०२४-२५ या हंगामात देशाने २७ हजार ३५ मेट्रिक टन एवढा आंबा परदेशी पाठवला असून, त्याची किंमत ४१,६४८ लाख एवढी आहे. यापैकी राज्यातून १९,८९२ मेट्रिक टन आंबा पाठविण्यात आला. त्याची किंमत ३२,३९९ लाख रुपये इतकी आहे.

नवी मुंबईतील वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या प्रमुख निर्यात सुविधा केंद्रावरून परदेशात आंबा निर्यातीला सुरुवात होणार आहे. यावर्षी चार हजार मेट्रिक टन आंबा निर्यात करण्याचे पणन मंडळाचे उद्दिष्ट आहे.

Mango Export आखाती देश, युरोपीय देश, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या निर्यातीत दरवर्षी ८० ते ८५ टक्के वाटा महाराष्ट्राचा असतो.

जपान, दक्षिण कोरिया व युरोपीय देशात हापूसबरोबर केसर, तोतापुरी, सुवर्णरेखा, बेगनपल्ली यांची निर्यात होते. कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावर अमेरिकन निरीक्षक दि. १ एप्रिलपासून उपलब्ध असणार आहेत.

आंबा निर्यातीचे उद्दिष्ट (मेट्रिक टन)
युरोपीय देश - १,७१०
न्यूझीलंड - २००
ऑस्ट्रेलिया - ७५
जपान - ७०
दक्षिण कोरिया - १०
एकूण - ३,३६५

अधिक वाचा: Mango Harvesting : आंबा फळातील नुकसान टाळण्यासाठी आंब्याची काढणी कशी करावी? वाचा सविस्तर

Web Title: Mango exports will start from the first week of April; How much will be exported to which countries this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.