Lokmat Agro >शेतशिवार > कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अवकाळीतील पीक कर्ज व्याजमाफी 

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अवकाळीतील पीक कर्ज व्याजमाफी 

Mango farmers in Konkan will get off-season crop loan interest waiver | कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अवकाळीतील पीक कर्ज व्याजमाफी 

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अवकाळीतील पीक कर्ज व्याजमाफी 

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना २०१५ मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे तीन महिन्यांची व्याजमाफी आणि पुनर्गठीत कर्जावरील व्याज अशी सुमारे ...

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना २०१५ मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे तीन महिन्यांची व्याजमाफी आणि पुनर्गठीत कर्जावरील व्याज अशी सुमारे ...

शेअर :

Join us
Join usNext

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना २०१५ मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे तीन महिन्यांची व्याजमाफी आणि पुनर्गठीत कर्जावरील व्याज अशी सुमारे साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे. 

आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम तातडीने जमा करण्याची कारवाही सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. अवकाळी पावसामुळे २०१५ मध्ये कोकणात आंब्याचे नुकसान झाले होते. 

आंब्याचे घडणारे उत्पादन, किडीमुळे होणारे नुकसान याबाबत कृषी मंत्र्यांचा अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे. या अंतर्गत कोकण कृषी विद्यापीठ आणि शेती तज्ञांचा समावेश करून तातडीने बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आंबा आणि काजू उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात बैठकीत माहिती दिली.

आंबा काजू उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात आज सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे, पणन मंत्री अब्दुल सत्तार, उद्योग मंत्री उदय सामंत आदी उपस्थित होते.

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २०१५ अशा तीन महिन्यांत अवकाळी पावसामुळे नुकसानीसाठी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना पीक कर्जावरील माफी जाहीर झाली होती. १२ हजार ५१३ कर्जदारांना ३ कोटी ३५ लाख ९३ हजार १७८ रुपये इतकी व्याज माफी आणि कर्जाचे पुनर्गठनापोटी ५ कोटी २६ लाख ५८ हजार ४३३ रुपये अशी व्याज रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. 

आंबा उत्पादन वाढीसाठी टास्क फोर्स

दापोली कृषी विद्यापीठाने दिलेल्या अहवालानुसार आताच्या हंगामात आंब्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत एकदम कमी म्हणजे केवळ १५ टक्के झाल्याचे नमूद केले आहे. याशिवाय गेल्या १५ वर्षांपासून थ्रीप्स रोगामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आंबा हे महाराष्ट्राचे महत्वाचे फळ आहे. अशारितीने नुकसान होत असल्यास उत्पादकांना मोठा फटका बसतो तसेच यावर गुजराण करणाऱ्या लाखो कुटुंबाना देखील ही झळ सोसावी लागते, यामुळे  कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तत्काळ एक टास्क फोर्स स्थापन करून त्यात कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, तसेच प्रगत, नामवंत प्रयोगशील  शेतकरी, तज्ज्ञ यांचा समावेश करावा आणि त्यांची एक बैठक लगेच घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

शेतकरी सधन झाला पाहिजे. पारंपरिक शेती आणि नव्या तंत्राने करण्यात येणारी शेती यातला फरक समजावून घेऊन आपल्याला काय नवे आत्मसात करता येईल, सेंद्रिय शेतीवर देखील कसा भर देता येईल, याकडे लक्ष द्या. आंब्यावरील कीटकनाशके प्रभावी ठरत नसतील, तर त्यासाठी योग्य त्या संशोधनाची गरज आहे. परदेशातही किडीसंदर्भात झालेले संशोधन अभ्यासून मार्ग काढावा आणि आंबा उत्पादकांना दिलासा द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी कृषी विद्यापीठास आणि कृषी विभागास सांगितले

 

Web Title: Mango farmers in Konkan will get off-season crop loan interest waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.