गावरान आंब्याची लज्जत ऐन उन्हाळ्यात चाखायला मिळायची, मात्र सध्या आंब्याच्या झाडांची कमी झालेली संख्या व असलेल्या झाडांवरील निसर्गाच्या अवकृपेने गळलेला मोहोर यामुळे भविष्यात गावरान आंबा हद्दपार होण्याच्या स्थितीत आहे.
उन्हाळ्याचे तळपते उन त्यास लज्जतदार गोड आंबाच्या रस त्याची गोडी ही कुणासही ओढ निर्माण करणारी आहे. मात्र गत काही वर्षापासून शेतातील आंब्याच्या झाडांची संख्या कमालीची कमी झाली आहे. शेतातील पिकावर अवलंबून असते पण यावेळी मार्च महिन्यात अवकाळी पावसाने झोडपले, त्यामुळे आंब्याच्या झाडाला फळे पुर्ण गळाले. उत्पन्नात होणारी घट यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील आंब्याचे बहरलेले झाडे उपटून टाकले आहे.
झाडांची संख्या कमी झाल्याने गावरान आंबे मिळणे कठीण झाले आहे. त्याबद्दल्यात महागडे बदाम, केशर, लालबाग, कलमी, निलम ही आंबे आता बाजारात मिळू लागली आहेत. हे आंबे महागडे असल्याने गोरगरिबांना त्याची चव चाखणे कठीण आहे. मात्र पूर्वी भरभरून असलेल्या आमराया आता दिसेनाशा झाल्या आहेत.
भरगच्च आंब्याची झाडे, तसेच आपल्या शेतामध्ये उभी असलेली झाडे मनसोक्त आंबे देत होते. त्यात संत्र्या, गोटी, आमट्या, गोड्या, भदाड्या, काळू अशा विविध नावाने ही आंब्याची झाडी ओळखल्या जायायचे, आता मात्र शेतकरी आपल्या शेतात अधिकाअधिक पीक काढण्याच्या चढाओढीत आहे. त्यामुळे शेताच्यामध्ये सावली देणारे कुठलेही झाड तो उपटून टाकत आहे. त्यात बहुतांश आंब्याची झाडांची संख्या कमी होत आहे.
त्यामुळे अचानक वातावरनात झालेला बदल उष्ण व दमट वातावरण निर्माण झाल्याने काही आंबे आले ते पण गळाले आहेत.
गारवा देणारी आमराई दिसेना
केवळ पीक कमी होते म्हणून आंब्याची झाडे बिनधास्तपणे तोडून शेतातील गारवा तर गमावल्या गेलाच पण रानमेवा म्हणून मानल्या जाणाऱ्या ह्या आंब्याला हद्दपार करून गेला आहे. गारवा देणारी आमराई आता दिसेनासे झाली आहे.
हेही वाचा - गोड चवीचा आणि पिकलेला आंबा आता ओळखा या सोप्या टिप्सने