लातूर : राज्यातच नव्हे तर देशपातळीवर साखर कारखानदारीत नावलौकिक असलेल्या मांजरा Manjara परिवारातील मुख्य आधारस्तंभ असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने sugar factory चालू गळीत हंगामात १७ डिसेंबरपर्यंत १ लाख १४ हजार ४० मे. टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ८७ हजार ४५० क्विंटल साखर उत्पादन केले.
चालू हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २ हजार ७०० रुपये प्रति मेट्रिक टनप्रमाणे पहिली उचल जमा करण्यात आली आहे.
मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री व कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांनी शेतकरी हिताचा विचार करून जाहीर केल्याप्रमाणे चालू हंगामात गळीतास दिलेल्या ऊसापोटी पहिली उचल प्रति मे. टन २ हजार ७०० रुपयांप्रमाणे अदा करण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे.
या निर्णयानुसार २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत गळीतास आलेल्या उसाला २ हजार ७०० रुपये प्रति मे. टनप्रमाणे मंगळवारी संबंधित ऊस उत्पादकांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला पाठवला आहे, त्यांनी आपल्या बँक शाखेतून ऊस बिलाच्या रकमेची उचल करावी. तसेच जास्तीत जास्त उत्पादकांनी आपला ऊस मांजरा कारखान्याला गाळपास पाठवावा, असे आवाहन संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस पाठवावा...
* विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. त्यातून शेतकरी समृद्ध झाल्याचे चित्र दिसत आहे.
* मांजरा कारखान्याचा यंदा गळीत हंगाम सुरू असून, १७ डिसेंबर अखेरपर्यंत कारखान्याने १ लाख १४ हजार ४० मे. टन उसाचे गाळप केले आहे. तसेच ४७ लाख ४९ हजार ६३५ केडब्ल्यूएच विजेची निर्यात महावितरण कंपनीला केली आहे. ११ लाख ५९ हजार ४३३ लिटर इथेनॉलचे उत्पादन केले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Sugarcane FRP 2024-25 : एफआरपीप्रमाणे भाव दिला नाही, तर कारखान्याचे धुराडे बंद; वाचा सविस्तर