Market Yard:
अकोला :बाजारात नवीन शेतमाल येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता असल्याने अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणल्या जाणाऱ्या शेतमाल सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.
शेतकरी, अडत्यांनी समन्वय ठेवून दक्षता घ्यावी, असे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीने आवाहन केले आहे. ढगाळ वातावरण असल्याने दिवसा लिलावाच्या वेळेचा अंदाज घेऊन, सकाळपासून शेतमालाचे खुले ढीग करू नये, याची सूचना कामगारांना द्यावी, अशावेळी पाऊस आल्यास खुले शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अडत्यांनी दक्षता घेणे आवश्यक असून नुकसान होणार नाही, याकरिता अडत्यांकडून दक्षता जरी घेतली जात आहे. परंतु आता अधिक काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचेही म्हटले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या काही दिवसात सोयाबीन मालाची आवक वाढत असून अडतमध्ये आलेला शेतमाल व्यवस्थित उतरवून घेण्याकरीता बाजार समिती कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार योग्य व्यवस्थित, सुरक्षित ठेवावा, असेही बाजार समितीने म्हटले आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीमध्ये वाहनांची गर्दी झाल्यास व शेतमाल आवारामध्ये जागा उपलब्ध नसल्यास आपले अडतमध्ये शेतमाल विक्रीस आल्यास तो शेतमाल दुकान, गोदामामध्ये उतरविल्यास नुकसान टाळता येणार आहे.