भारत हा एक कृषी प्रधान देश आहे, भारताचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. भारताच्या विविध भागामध्ये विविध प्रकारची शेती केली जाते.
महाराष्ट्रांमध्ये विविध भागामध्ये तापमान, हवामान, प्रजन्यमान यांच्यावर अवलंबून शेती केली जाते. यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खान्देश या प्रमुख विभागामध्ये वेगवेगळी पिके घेतली जातात. पण पूर्वी कमकुवत तंत्रद्यान, बाजारपेठांची कमतरता इत्यादी प्रकारच्या गैरसोयींमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत असे. हे नुकसान टाळण्यासाठी भरीव, उत्तम असे तंत्रद्यान विकसित झाले, सुसज्य बाजारपेठा निर्माण झाल्या, शासनाच्या विविध योजना आल्या. त्याचा उपयोग करून शेतकरी स्वतः आपला उत्पादित माल बाजारात नेऊन विकतो.
तरी सुध्या शेतकर्यांच्या मालाला पुरेपूर भाव मिळत नसे, त्याच मुख्य कारण म्हणजे बाजारपेढामध्ये एकाच वेळेस जास्त प्रमाणात उपलब्ध झालेला माल, मालाची गुणवत्ता, नैसर्गिक संकटे, वाहतुकीची गैरसोय, साठवणुकीची गैरसोय इत्यादी. त्यावर उपाय म्हणून व नवनवीन तंत्रद्यान बळावर शेतकर्यांसाठी आपल्या शेतातील मालाचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून त्याची विक्री करणे, यामुळे शेतकर्यांना भरपूर फायदा होत आहे.
यामध्ये अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये प्रक्रियाकरून त्याची विविध पदार्थ तयार केले जातात. जसे की, वाळलेल्या हळदी पासून हळद पावडर तयार करणे, चिंचपासून पावडर, कच्या केल्यापासून वेफर्स बनवणे इत्यादी. मात्र यात महत्वाची अडचण म्हणचे तयार केलेल्या पदार्थासाठी विक्री करणे.
शेतकऱ्यांनी प्रक्रिया करून तयार केलाला माल किंवा त्यांचा कच्चामाल (भाजीपाला, दूध, भुसारमाल इत्यादी) यांची विक्री कुठे व कशी केली जाते, त्यासाठी कोण कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो इत्यादी. प्रामुख्याने बाजारपेठ हि एक मालाची देवाण घेवाण करण्याचे एक ठिकाण आहे.
या मध्ये बाजारपेठ कशी मिळवायची ? बाजारपेठ हि शेतकर्यांच्या मालावर अवलंबून असते कच्चा माल, प्रक्रियायुक्त केले पदार्थ, भुसारमाल यासाठी विविध बाजापेठ उपलब्ध असतात. यामद्धे शासनाच्या प्रामुख्याने सहभाग असतो, यासाठी शासनाने कृषी पणन मंडळ, बाजार समिती इत्यादी बारपेठा उपलब्ध करून दिल्या आहेत.
१. उत्पादक ते घाऊक बाजार
यांमध्ये घाऊक व्यापारी हा उत्पादक किंवा शेतकऱ्याचा सर्व माल खरेदी करतो. यामध्ये प्रामुख्याने भुसार माल, भाजीपाला, फळे किंवा प्रक्रियायुक्त केलेले पदार्थ याची विक्री होते. यासाठी लिलाव पद्धत सुद्या उपयोगात येत्ते, यामध्ये शेतकऱ्यांच्या मालानुसार व मालाच्या गुवत्तेनुसार त्याचा भाव ठरवून त्याचे बोली लागते. यामध्ये ज्या घाऊक व्यापाऱ्याला तो भाव परवडेल तो त्याची खरेदी करतो यासाठी घाऊक व्यापारी आडतीचा वापर करतात व घाऊक व्यापाऱ्याकडे साठवणुकीची सुविधा सुद्धा असते. उदा. बीट बाजार, आडत दुकान, दूध डेअरी इत्यादी.
२. घाऊक व्यापारी ते किरकोळ व्यापारी
या मध्ये उत्पादक शेतकर्यांकडून खरेदी केलेला माल हा घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना विकतो. तोच माल किरकोळ व्यापारी हा साधारण ग्राहकांना विकतो.
३. उत्पादक ते ग्राहक
या प्रकारांमध्ये उत्पादकचा माल हा प्रत्यक्षपणे ग्राहक खरेदी करतो, यामध्ये उत्पादकला प्रत्यक्षपणे भरपूर फायदा होतो. यासाठी उत्पादकाला बाजारपेठांमध्ये जाऊन विक्री करावी लागते. उत्पादकाच्या मालावरून त्याची विक्री कुठे व कशी करायची हे ठरवले जाते, यासाठी विविध प्रकारचे बाजारपेठांचा उपयोग होतो. या बाजापेढामध्ये शक्यतो कमी काळ टिकणारी मालाची विक्री होते उदा. दूध व दुधाचे पदार्थ, फळे, भाजीपाला यासाठी खालील बाजारपेठांमध्ये यांची विक्री होते.
उपादक/शेतकरी↓घाऊक व्यापारी↓किरकोळ व्यापारी↓साधारण ग्राहक
अ) आठवडी बाजार
आठवडी बाजारमध्ये उत्पादकचा माल हा प्रत्यक्षपणे ग्राहक खरेदी करतो, यामध्ये उत्पादकाला प्रत्यक्षपणे भरपूर फायदा होतो. यासाठी गावच्या, वाड्याच्या, शहराच्या, तालुक्याच्या ठिकाणी सात दिवसाच्या अंतराने बाजारपेठ भरवली जाते.
ब) फिरस्ती बाजार
या पद्धतीमध्ये उत्पादक त्याचा माल हा गावोगावी, वस्तीमध्ये फिरून त्याची विक्री केली जाते, घरोघरी जाऊन तो आपला माल विकतो, या पद्धतीमध्ये देखील उत्पादकला प्रत्यक्षपणे भरपूर फायदा होतो. अश्या प्रकारच्या बाजारचा उपयोग करून शेतकरी किंवा उत्पादक आपला शेतातील माल किंवा प्रक्रिया केलेले पदार्थाची विकी केली जातात.
लेखक १) डॉ. सोनल झंवर२) प्रा. सत्वसे अमरजीत नरेंद्र३) प्रा. फलफले मोनिका गंगाधरसहाय्यक प्राध्यापक, एम. एम. जी. अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, छत्रपती संभाजीनगर
हेही वाचा - Success Story आंब्याने दिली सुखाची दिशा; प्रगतीशील मिठ्ठू काकांची ही यशकथा