Join us

Ladki Bahin Yojana Diwali Bonus : खुशखबर! दिवाळीपूर्वी बहिणींना मिळणार आता गिफ्ट; काय आहे योजनेच्या "अटी" वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:10 AM

राज्य सरकारने ''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'' सुरु केली आहे. आतापर्यंत ५ महिन्याचे पैसे मिळाले आहेत. आता दिवाळी बोनसही मिळणार आहे काय ते वाचा सविस्तर (Mazi Ladki Bahin Yojana Diwali Bonus)

Mazi Ladki Bahin Yojana Diwali Bonus :  राज्य सरकारने ''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'' सुरु केल्यापासून पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहे. जवळपास दोन कोटी महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाल्याचे शासनाने कळविले आहे. पाच महिन्यांच्या हप्त्यांची रक्कम महिलांना मिळाली असल्याची माहिती सरकारने दिली आहे. 

लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना आतापर्यंत ५ महिन्याचे ७५०० रुपये मिळाले आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर महिलांना ३००० रुपयांचा बोनस दिला जाईल, असे सरकारने सांगितले आहे.  या योजनेत काही निवडक मुली आणि महिलांना अतिरिक्त २५०० रुपयांची रक्कमही दिली जाणार आहे. त्यामुळे महिलांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. 

आता परत एकदा दिवाळीपूर्वी महिलांसाठी एक खुशखबर देण्यात आली आहे. सरकारकडून महिलांना दिवाळीसाठी मोठे गिफ्ट देण्यात येणार आहे. दिवाळीनिमित्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ३००० रुपयांचा बोनस मिळणार आहे. याशिवाय काही निवडक महिलांना अतिरिक्त २५०० रुपये दिले जाणार आहेत. 

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिवाळीसाठी दिवाळी गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. सरकारकडून दिवाळीच्या सणानिमित्त योजनेच्या सर्व पात्र महिलांना ३००० रुपयांचे बोनस देण्यात येणार आहे. 

दरमहा मिळणाऱ्या पैशांच्या व्यतिरिक्त हा दिवाळी बोनस असणार आहे. तसेच काही निवडक महिलांना २५०० रुपयांची अतिरिक्त रक्कमही दिली जाईल. याप्रकारे काही महिलांना एकूण ५५०० ( ३०००+ २५००) रुपयांचा लाभ मिळणार आहे. दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे. 

पण दिवाळी बोनस कोणाला मिळणार ? 

''मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना'' एक महत्त्वाकांशी योजना आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हाच या योजनेचा उद्देश आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची रक्कम दिली जाते. लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातात.पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही नियम पाळावे लागतात. * वय २१ ते ६० वर्षांमध्ये असले पाहिजे. * महाराष्ट्राचे रहिवाशी असले पाहिजेत. 

* वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे.  या नियमांचे पालन करणाऱ्या महिलांना दिवाळी बोनस मिळणार आहे.

 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील? 

* महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असले पाहिजे.* त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे. * त्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेले पाहिजे.* ही योजनेतील सर्व नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे.* या अटी पूर्ण केलेल्या सर्व महिलांना ३००० रुपयांचा बोनस मिळेल. * ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. 

अर्ज करण्याची आज शेवटची तारीख 

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी नव्याने अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली होती. ३० सप्टेंबरपर्यंत मुदत होती त्यात वाढ करून आता आज(१५ ऑक्टोबर) पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.  त्यामुळे आजही या योजनेसाठी महिला अर्ज करू शकतात. 

टॅग्स :शेती क्षेत्रलाडकी बहीण योजनेचामहिलामहिला आणि बालविकासमहाराष्ट्र