Join us

कमी पावसात पिक व्यवस्थापनात करावयाच्या उपाययोजना

By बिभिषण बागल | Published: August 16, 2023 6:00 AM

अनियमित पाऊस पडल्याने खरीप पिके संकटात आली आहेत. पिकांची वाढ खुंटल्याची दिसून येत आहेत पाने पिवळे पडलेली दिसतात, किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे.

सध्याच्या खरीप हंगामात सोयाबीन, तूर, उडीद, मूग, भुईमूग, मका व कपाशी इत्यादी पिकांची पेरणी केलेली आहे परंतु एकूणच पाऊस १०० मिलिमीटर पेक्षा कमी झालेला आहे तोही कुठेतरी अनियमित पडल्याने खरीप पिके संकटात आली आहेत. पिकांची वाढ खुंटल्याची दिसून येत आहेत पाने पिवळे पडलेली दिसतात, किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे, जमिनीत ओल नसल्याने अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होत नाहीत.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी फवारणीद्वारे पिकावर पानातील शिरा हिरव्या असून पानातील मधला भाग पिवळा पडल्यास विशेषता मुग, उडीद, सोयाबीन, तूर, व भुईमूग या पिकांवर दिसून आल्यास ताबडतोब फुले द्रवरूप सूक्ष्म ग्रेड II या सूक्ष्म पोषक द्रव्याची  फवारणी १०० मिली प्रति १० लिटर पाण्यातून आठ दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी या पोषक द्रव्यात कोणतेही विद्राव्य खत कीटकनाशके मिसळू नये. मात्र हीच लक्षणे पानावर खडबडीत आकाराचे पिवळे पट्टे पडल्यास  मोझॅक विषाणू रोगाची लागण झाली असे समजावे यासाठी हा रोग पसरविणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडींचा बंदोबस्त करावा त्यासाठी निंबोळी ५% अर्काची फवारणी करावी तसेच शेतात चिकट सापळे लावावेत.

बदलत्या हवामानात पाऊस कमी असून तापमानात सुद्धा चढ-उतार दिसून येत आहेत,त्यामुळे कपाशी मकासारख्या पिकांची वाढ अपेक्षेप्रमाणे झालेली नाही तरी चांगली वाढ होण्यासाठी सूक्ष्म ग्रेड II ची फवारणी करावी त्यानंतर १०० ग्रॅम १९:१९:१९ या विद्राव्य खताची दहा लिटर पाण्यातून आलटून पालटून फवारणी करावी, मात्र सूक्ष्म ग्रेडमध्ये कोणतेही विद्राव्य खत किंवा कीटकनाशक एकत्र करून फवारणी करू नये.

ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था आहे त्यांनी मका व कपाशी पिकासाठी वापस्यावर सूक्ष्म ग्रेड II या सूक्ष्म पोषण मूलद्रव्याची १०० मिली दहा लिटर पाण्यातून आळवणी करावी अशाप्रकारे फवारणी किंवा आळवणी केल्यास कपाशीचे पातेगळ होणार नाही फुलांची संख्या वाढून बोंडांची वाढ चांगली होईल तसेच मका पिकात कणसात दाणे संपूर्ण भरतील अशाप्रकारे शेतकरी बंधूंनी वेळीच उपाययोजना फवारणी द्वारे केल्यास भविष्यातली पिकांच्या उत्पन्नात होणारी घट कमी करता येईल

डॉ. अनिल दुरगुडेमृदशास्त्रज्ञ, मृद विज्ञान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी9420007731 

टॅग्स :शेतीखरीपपीकपीक व्यवस्थापनपाऊसपेरणीशेतकरी