Join us

हवामानतज्ज्ञ व किकुलॉजीचे लेखक प्रा. किरणकुमार जोहरे यांना जीवनगौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 3:34 PM

प्रा. किरणकुमार जोहरे हे पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविदयालयातील इलेक्ट्रॉनिक सायन्स व कॉम्प्युटर सायन्स विभागात कार्यरत असून आजतागायत त्यांनी महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना विनामोबदला हवामान माहिती पुरवून सजग केले आहे. त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे.

मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांना हवामान तंत्रज्ञान सजग करण्यासाठी ‘किकुलॉजी’ सदर चालविणारे लोकमत ॲगोचे लेखक, हवामानतज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांना सन २३-२४चा महात्मा कबीर समता परिषदेचा महाराष्ट्रभूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकुंदराज पाटील,  निवड समितीचे अध्यक्ष व मुंबई हिन्दी विद्यापीठ मुंबईचे  कुलगुरू डॉ. बलदेव सिह चौहाण यांनी नुकतीच पुरस्काराची घोषणा केली. पुरस्काराचे लवकरच मुंबई येथे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत वितरण  होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

प्रा. किरणकुमार जोहरे हे पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविदयालयातील इलेक्ट्रॉनिक सायन्स व कॉम्प्युटर सायन्स विभागात कार्यरत असून आजतागायत त्यांनी महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना विनामोबदला हवामान माहिती पुरवून सजग केले आहे.

मान्सून, चक्रीवादळ, विजा, गारा, ढगफुटी, महापूर, दुष्काळ आदी हवामानविषयक माहिती देऊन गेल्या २० वर्षांपासून ग्रामीण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतीने राष्ट्रीय उत्पन्न वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या शैक्षणिक व वैज्ञानिक संशोधन कार्याबद्दल त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

आजतागायत अमेरिकेसह जगातील १०० पेक्षा अधिक देशांनी त्यांच्या संशोधनाची दखल घेतली असे प्रा किरणकुमार जोहरे आंतरराष्ट्रीय ढगफुटी तज्ज्ञ म्हणून देखील ओळखले जातात. एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये आणि सकारात्मक विचाराने शेतकऱ्यांची व पर्यायाने देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी व अखिल मानवजातीच्या भुकेची समस्या सोडवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशीन लर्निंग (एमएल), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), ब्लॉकचेन आदी एडव्हान्सड् इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा वापर प्रा. जोहरे संशोधनासाठी करत आहेत.

पुरस्कार  निवडीबद्दल मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, सरचिटणीस ॲड. नितीनजी ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख, महिला संचालक श्रीमती शोभाताई बोरस्ते, मविप्र शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र मोरे, सुनिल पाटील. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य दिलीप माळोदे, कार्यालयीन अधिक्षक आनंदा पवार, इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग प्रमुख व आयक्यूएसी कोऑर्डिनेटर प्रा भगवान कडलग, कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख प्रा मनिषा सोनवणे आदीसह सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीहवामान