MGNREGA Wages: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (रोहयो) मजुरांच्या मजुरीत मागील पाच वर्षांत केवळ १० ते २४ रुपये इतकीच किरकोळ वाढ झाली आहे. (MGNREGA Wages)
वाढत्या महागाईच्या तुलनेत ही वाढ अपुरी ठरत असून, यंदा एप्रिलमध्ये मजुरीचा दर ४०० रुपये करण्यात यावा, अशी कामगार संघटनांची मागणी आहे. रोजगार हमी योजनेत (रोहियो) काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरी दरात मागील पाच वर्षांत केवळ तुटपुंजी वाढ झाली आहे. (MGNREGA Wages)
वाढत्या महागाईचा दर बघता मजुरांना मिळणारी ही मजुरी परवडेनाशी झाली आहे. १ एप्रिलला मजुरीचे नवे दर केंद्राकडून जाहीर होतात. त्यामुळे आता त्याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे. (MGNREGA Wages)
मागील पाच वर्षांतील दरवाढीचा आलेख बघता यंदा तरी आशादायक चित्र दिसेल का? असा प्रश्न कामगार उपस्थित करत आहेत. राज्यातील ग्रामीण व डोंगराळ भागात ज्या कुटुंबातील प्रौढ सदस्यांनी स्वेच्छेने अकुशल शारीरिक काम केले आहे. (MGNREGA Wages)
अशा प्रत्येक कुटुंबाला रोजगाराची हमी देऊन कामाचा अधिकार सुरक्षित करण्यासाठी वर्ष १९७७ मध्ये महाराष्ट्र रोजगार हमी कायदा करण्यात आला. (MGNREGA Wages)
वर्ष २००५ मध्ये त्याचे रूपांतर केंद्रीय कायद्यामध्ये झाले. लगेच दुसऱ्या वर्षी म्हणजे २००६ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे २००८ मध्ये 'महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजना', असे नामांतर झाले. (MGNREGA Wages)
या योजनेत केंद्रांकडून शंभर दिवसांचे व उर्वरित २६५ दिवसांचा निधी राज्य सरकार देते. प्रारंभी या योजनेत मजुरी दर अल्प असताना धान्याचे कूपन देण्यात येत होते. यामध्ये वर्षनिहाय सुधारणा होत जाऊन आता रोख रक्कम मजुरांच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात जमा केल्या जाते.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात ग्रामीण क्षेत्राचा ग्राहक किमती निर्देशांक ६ टक्के व शहरी क्षेत्रात तो ४.५ टक्के असल्याचे समोर आले आहे. 'रोहयो' म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGA) महाराष्ट्रात काम करणाऱ्या कामगारांना प्रतिदिवस २९७ रुपये मजुरी दिला जातो. ही मजुरी कामी आहे त्यामुळे आता यात वाढ होणे आवश्यक आहे.
मजुरीचे दर निश्चित करण्याचे सुत्र
काळ, काम व वेग या सूत्राने एक मजूर प्रतिदिवस ८ तासांत किती काम करू शकतो, या बाबींवर मजुरीचे दर निश्चित केले जातात.
'या' कामांना दिले जाते प्रोत्साहन
ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे. महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत विविध कामांना प्रोत्साहन मिळत आहे. या योजनेत विविध प्रकारची कामे केली जातात. यात शेती, जलव्यवस्थापन, रस्ते, बांधकाम आदी विविध कामे केली जातात.
चारशे रुपये दर करण्याची मागणी
* सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांना २९७ रुपये दर दिला जातो. मजुरीचे दर केंद्र सरकारद्वारे निश्चित केले जातात.
* दर वर्षी १ एप्रिलला ते जाहीर करण्यात येतात. यंदा हे दर चारशे रुपये करण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे.