Lokmat Agro >शेतशिवार > कोकणात भाजीपाला पिकासाठी सूक्ष्म तुषार सिंचन फायदेशीर

कोकणात भाजीपाला पिकासाठी सूक्ष्म तुषार सिंचन फायदेशीर

Micro irrigation beneficial for vegetable crop in konkan | कोकणात भाजीपाला पिकासाठी सूक्ष्म तुषार सिंचन फायदेशीर

कोकणात भाजीपाला पिकासाठी सूक्ष्म तुषार सिंचन फायदेशीर

कोकणातील जांभ्या दगडापासून तयार झालेल्या जमिनीची सच्छिद्र रचना तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे प्रचलित पद्धतीने (सपाट वाफे, सरी वरंबे) पाणी दिल्यास पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचऱ्याद्वारे हास होतो.

कोकणातील जांभ्या दगडापासून तयार झालेल्या जमिनीची सच्छिद्र रचना तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे प्रचलित पद्धतीने (सपाट वाफे, सरी वरंबे) पाणी दिल्यास पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचऱ्याद्वारे हास होतो.

शेअर :

Join us
Join usNext

रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्रातून भाजीपाला विक्रीसाठी येतो. काही प्रमाणात परसबागेतून भाजीपाला लागवड केली जात आहे. कोकणात नव्याने निर्माण होत असलेल्या लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांमुळे तसेच भाजीपाल्याला मिळणारा भाव व तुलनात्मकदृष्ट्या लागणारा अल्प कालावधी यामुळे कोकणातील अनेक शेतकरी भात पिकानंतर भाजीपाला लागवडीकडे वळू लागले आहेत. भाजीपाला लागवडीमध्ये सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे या पिकांच्या मशागत व काढणीसाठी जास्त मजुरांची आवश्यकता असते. पाण्याची व मजुरांची बचत व उत्पादन वाढ याबाबतीत सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीचा वापर आवश्यक ठरतो.

कोकणातील जांभ्या दगडापासून तयार झालेल्या जमिनीची सच्छिद्र रचना तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे प्रचलित पद्धतीने (सपाट वाफे, सरी वरंबे) पाणी दिल्यास पाण्याचा मोठ्या प्रमाणात निचऱ्याद्वारे हास होतो. त्यामुळे पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर कमी ठेवावे लागते. सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीत प्रचलित पद्धतीपेक्षा पाण्याची ५० टक्के बचत होऊन उत्पादनात वाढ होते.

सूक्ष्म तुषार सिंचन पद्धत म्हणजे ठिबक सिंचन व फवारा सिंचन यामधील प्रकार होय. सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीमध्ये तोटी (ड्रिपर) प्रमाणे पाणी ठिबकत न राहता नोझलमधून कारंज्याप्रमाणे सूक्ष्म फवारा उडत राहतो. सरासरी एका नोझलमधून ४ ते ६ चौरस मीटर क्षेत्र भिजते. या पद्धतीमुळे जमिनीचा पृष्ष्ठभाग पूर्ण भिजत असल्यामुळे पाणी व अन्नद्रव्य शोधून घेण्यासाठी पूर्ण क्षेत्राचा लाभ घेता येतो. सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीत संचाची जोडणी ठिबक संचाप्रमाणे केली जाते. मुख्य नळीत पाणी पंपाद्वारे दाबाखाली (१.५ ते २.६ कि/चौ. सें.मी) आणले जाते. दोन उपनळ्यांमध्ये तसेच दोन सूक्ष्म फवाऱ्याच्या नोझलमध्ये सर्वसाधारणपणे दोन ते २.५ मीटर अंतर ठेवता येते.

सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीत दोन प्रकारचे नोझल वापरले जातात. पहिल्या प्रकारच्या नोझलमध्ये विशिष्ट प्रकारच्या खाचांमुळे पाणी साधारणतः २.५ ते ३ मीटर व्यासाच्या वर्तुळाकार भागात धारेच्या स्वरूपात फेकले जाते. या प्रकारच्या नोझलला जेट्स म्हणतात. दुसऱ्या प्रकारच्या नोझलला 'मायक्रो- स्प्रिंकलर्स' असे म्हणतात.

चालविण्याची गरज
पिकाची दररोजच्या पाण्याची गरज प्रामुख्याने भाज्यांचा प्रकार, हंगाम तसेच पिकाच्या वाढीनुसार बदलते. यासाठी आदल्या दिवसाच्या बाष्पीभवनानुसार पाणी देणे गरजेचे आहे. गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यास उत्पादनात घट होते. बाष्पीभवन मापक गुणांक ०.७ एवढा असतो. पर पॉक: गुणांक हा पिकाच्या वाढीनुसार बदलत असतो. सुरुवातीला ०.३ ते ०.४ तर वाढीच्या अवस्थेत ०.७ ते ०.८, जोमदार वाढीच्या अवस्थेत १.०५ ते १.२ व काढणी अवस्थेत ०.६५ ते ०.७५ इतका असतो. सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीत मर्यादित सिंचनाचा वापर असल्याने पाण्याचा अपव्यय न होता बचत होते.

Web Title: Micro irrigation beneficial for vegetable crop in konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.