मिलेट अर्थात पौष्टिक तृणधान्यांचा आहारातील समावेश हा आरोग्यासाठी हितकारक असून, मिलेटचे उत्पन्न वाढविण्यासाठी लातूर जिल्ह्यात कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात २०० हेक्टरवर मिलेट पेरणीचे नियोजन करण्यात आले असून, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते लोदगा येथून मिलेट पेरणीला सुरुवात करण्यात आली. तसेच बचत गटांच्या महिलांनी मिलेटपासून तयार केलेल्या पदार्थांचाही यावेळी त्यांनी आस्वाद घेतला.
पोषणाच्या दृष्टीने मिलेट आहे फायदेशीर
राळा : यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवते. त्यातील अँटीऑक्सिडन्ट हा गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. मोड आलेले राळा खाल्ल्यास हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडे बळकट होतात.
तसेच अर्धशिशी, निद्रानाश, कॉलरा, ताप यांच्या उपचार पद्धतीमध्ये राळ्याचा प्रामुख्याने वापर होतो. राळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. मेंदूची कार्यक्षमता वाढते.
मिलेट पोषणाच्या दृष्टिकोनातून भातापेक्षा अधिक फायदेशीर आहे. त्यामध्ये अधिक कॅलरीज, प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि थायमिन (बी१) असतात. त्यामुळे, मिलेटचा समावेश आहारात केल्यास अनेक पोषणतत्त्वे अधिक प्रमाणात मिळू शकतात, ज्यामुळे एकंदरीत आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते.
नाचणी: शक्तीवर्धक, पित्तशामक असल्याने नाचणी रक्त शुद्ध करण्यास उपयुक्त आहे. कॅल्शियम आणि लोह मुबलक असल्याने गरोदर महिला व वयोवृद्ध व्यक्तींना हाडांसाठी व अॅनिमियावर नाचणीचे पदार्थ उपयोगी ठरतात.
* नाचणीमुळे लठ्ठपणा कमी करणे, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी, यकृतातील चरबी कमी करण्यास मदत होते.
* वरई : नवजात शिशू, बालक आणि माता यांच्यासाठी उत्तम पोषकधान्य आहे. मिलेट पोषणाच्या दृष्टिकोनातून भातापेक्षा अधिक फायदेशीर आहे. त्यामध्ये अधिक कॅलरीज, प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि थायमिन (बी१) असतात. त्यामुळे, मिलेटचा समावेश आहारात केल्यास अनेक पोषणतत्त्वे अधिक प्रमाणात मिळू शकतात, ज्यामुळे एकंदरीत आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते.
बाजरी : बाजरीमध्ये कॅल्शियम, विटामिन ए, बीच फॉस्फरस, लोह, मँगेनीज अधिक मात्रेत उपलब्ध असते. रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित, रक्तदाबावर नियंत्रण, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी व अॅनेमिया आजारावर मात करण्यासाठी बाजरी उपयुक्त आहे. रक्तातील मेधाचे प्रमाण नियंत्रित तसेच रक्तदाब नियंत्रित राहतो.