सिल्लोड : तालुक्यातील भराडी येथे सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत मराठवाड्यातील पहिल्या मिरची प्रक्रिया सुविधा केंद्राचे व बनकिन्होळा येथे मिरची प्रक्रिया केंद्र, शीतगृह आणि निर्यात केंद्र तसेच कंकराळा येथे फळ प्रक्रिया, शीतगृह, साठवणूक, हाताळणी व निर्यात केंद्र प्रकल्पाचे भूमिपूजन बुधवारी (२ ऑक्टोबर) रोजी दुपारी ३ वाजता पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.
यानिमित्त भराडी येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले की, भूमिपूजन केलेल्या प्रत्येक केंद्रासाठी १३ कोटी, असा एकूण ३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, डॉ. अनमोल यादव, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, माजी उपसभापती नंदकिशोर सहारे, बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे, उपसभापती दारासिंग चव्हाण, माजी सभापती रामदास पालोदकर, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, देविदास लोखंडे, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे, गजानन महाजन, देविदास पालोदकर, डॉ. संजय जामकर, श्रीरंग साळवे, दामूअण्णा गव्हाणे, भावराव लोखंडे, जयराम चिंचपुरे, सुनील पाटणी, दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, मेघा शाह आदी उपस्थित होते.
पोखरा योजनेसाठी ११ हजार कोटींची तरतूद
• यावेळी सत्तार यांनी सांगितले की, सिल्लोड येथे कृषी भवन उभारण्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी, ५ हजार कोटींच्या पोखरा योजनेसाठी ११ हजार कोटींची तरतुद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिल्लोडला दूध संघ स्थापन करण्यात आला आहे.
• शेतकऱ्यांना अनुदानावर गार्डचे वाटप करण्यात येणार आहे. पणन विभागाच्या माध्यमातून गाव तेथे गोडावून ही योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.