Lokmat Agro >शेतशिवार > कमी पाणी आणि कमी खतांचे आधुनिक कापूस लागवड तंत्रज्ञान

कमी पाणी आणि कमी खतांचे आधुनिक कापूस लागवड तंत्रज्ञान

Modern cotton cultivation technology with less water and less fertilizers | कमी पाणी आणि कमी खतांचे आधुनिक कापूस लागवड तंत्रज्ञान

कमी पाणी आणि कमी खतांचे आधुनिक कापूस लागवड तंत्रज्ञान

सघन लागवड पद्धतीतून राज्यात कापूस उत्पादकतेत सरासरी २० ते ५३ टक्के, तर अतिसघन लागवड पद्धतीद्वारे सरासरी २१ ते ५६ टक्के उत्पादकता वाढ नोंदविण्यात आल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.

सघन लागवड पद्धतीतून राज्यात कापूस उत्पादकतेत सरासरी २० ते ५३ टक्के, तर अतिसघन लागवड पद्धतीद्वारे सरासरी २१ ते ५६ टक्के उत्पादकता वाढ नोंदविण्यात आल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

जालना जिल्ह्यातील मौजे सिपोरा अंभोरा (ता. जाफराबाद) येथील अ‍ॅडव्होकेट श्री. रामेश्वर शिवाजीराव अंभोरे यांच्या शेतात शनिवारी (दि१६) भा.कृ.अ.प. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपुर, भा.कृ.अ.प. अटारी पुणे आणि वनामकृवि परभणी, कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने किसान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  

यावेळी केंद्रीय कापूस संशोधन संस्था महा. सदस्य तथा संशोधन समिती सल्लागार दादा लाड यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना आपल्या मार्गदर्शनात सघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचे फायदे, लागवडीची पद्धत, आणि काळजी घेण्याच्या बाबींविषयी माहिती दिली. तसेच सघन कापूस लागवड तंत्रज्ञानात, पारंपारिक पद्धतीपेक्षा जास्त रोपं प्रति एकर लावली जातात. यामुळे कापूस उत्पादनात लक्षणीय वाढ होते. तसेच, या तंत्रज्ञानामुळे पाणी आणि खताचा वापरही कमी होतो असेही संगितले.

यावेळी वनामकृवी, परभणीचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकातील सघन लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून कापूस उत्पादनात वाढ करण्याचे आव्हान केले. श्री. जी. आर. कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी उपस्थित शेतकर्‍यांना या पुढील वर्षी अधिकतर कापूस लागवड हि सघन पद्धतीने करून विक्रमी उत्पादन घ्यावे असे सांगितले. 

काय आहे हे तंत्रज्ञान आणि काय होतो फायदा?

जगातील इतर कापूस उत्पादक देशांच्या तुलनेत भारताची उत्पादकता तुलनेने कमी आहे. विशेष म्हणजे जागतिकस्तरावर लागवड क्षेत्राच्या बाबतीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. सुमारे १३० लाख हेक्टरवर भारतात कापसाची लागवड होते. परंतु, सुधारित लागवड आणि व्यवस्थापन पद्धतीचा अभाव असल्याने उत्पादकता इतर देशांच्या तुलनेत कमी आहे.

याकरिता केंद्र सरकारच्या वतीने सघन आणि अतिसघन कापूस लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी 'एचडीपीएस' (हाय डेन्सीटी प्लान्टिंग सिस्टिम) प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती.

देशांतर्गत कापसाच्या उत्पादकतेत वाढीच्या उद्देशाने सन-२०२३ मध्ये केंद्र सरकारने विशेष कापुस प्रकल्पाची घोषणा केली होती. शेतकर्‍यामध्ये कापूस पिकातील सघन आणि अती सघन लागवड पद्धतीचा प्रचार प्रसिद्ध करीता भा.कृ.अनु.प-केंद्रीय कापुस संशोधन संस्था, नागपुर, भा.कृ.अनु.प-अटारी, पुणे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर जि. जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सन-२०२३ पासून जालना जिल्ह्य़ातील जाफराबाद, अंबड आणि बदनापूर या तीन तालुक्या करिता विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे.

ज्याद्वारे कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर द्वारे अंमलबजावणी केलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्याच वर्षी सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या नियंत्रणात केव्हीके व इतर संलग्न संस्थांद्वारे याची महाराष्ट्रात देखील अंमलबजावणी झाली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आता समोर येत आहेत.

ज्या सघन लागवड पद्धतीतून राज्यात कापूस उत्पादकतेत सरासरी २० ते ५३ टक्के, तर अतिसघन लागवड पद्धतीद्वारे सरासरी २१ ते ५६ टक्के उत्पादकता वाढ नोंदविण्यात आल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.

सदरील शेतकरी मेळावा कार्यक्रमात, डॉ. इंद्र मणी, मा. कुलगुरु, व.ना.म.कृ.वी, परभणी हे अध्यक्षस्थानी होते. शेतकरी मेळावा कार्यक्रम-२०२४ मध्ये जालना जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २० प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाचे स्वागत संबोधन डॉ. एस. डी. सोमवंशी यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. डी. एन. गोखले, संचालक विस्तार शिक्षण, व.ना.म.कृ.वी, परभणी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी अ‍ॅडव्होकेट श्री. रामेश्वर शिवाजीराव अंभोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. एस. आर. धांडगे यांनी केले. 

सदरील कार्यक्रमास जाफराबादचे तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, खरपुडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र डॉ. श्रीकृष्ण सोनुने, पिक संरक्षण शास्त्रज्ञ केव्हिके खरपुडीचे प्रा. अजय मिटकरी, सिपोरा अंभोरा गावचे सरपंच श्री. दिनकर अंभोरे, तसेच अंबड जाफराबाद आणि बदनापूर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी पांडुरंग डोंगरे, संजय मोरे, जयकिसन शिंदे व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष कापुस प्रकल्प चे उप-अन्वेषक डॉ आर. एल. कदम, डॉ एस. आर. धांडगे, डॉ दिपाली कांबळे आणि वाय.पी-१ अजित डाके, अभिलाष बनसोडे यांनी परिश्रम घेतले. 

Web Title: Modern cotton cultivation technology with less water and less fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.