Join us

मोहफुलाचा साठा भरपूर मात्र संकलन केंद्रच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 15:37 IST

संकलन केंद्र सुरू करण्याची मागणी

चंद्रपुर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात मोहफुलाचे झाडे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे मोहफुल संकलित करणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एक-दीड महिन्याच्या हंगामात पूर्ण उन्हाळ्याची उदरनिर्वाहाची सोय होते. मात्र भाव योग्यप्रकारे मिळत नसल्याने अडचणी जातात. त्यामुळे गोंडपिपरी तालुक्यात मोहफुल संकलन केंद्र सुरू करण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

गोंडपिपरी परिसरात मोहफुलाची झाडे मोठ्या प्रमाणात आहे. रोजगाराची साधने नसल्याने उदरनिर्वाहासाठी उत्तम पर्याय ठरत आहे. शासनाने मोहफुल संकलन केंद्र सुरू केल्यास या भागातील नागरिकांना हंगामी रोजगार मिळण्यास मदत होईल.

मोहफुलास जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. आयुर्वेदातही मोठे महत्त्व आहे. या भागातील नागरिक हंगामात जीव धोक्यात घालून मोहफुल संकलित करतात. परंतु, विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे मोठी अडचण जाते.

शासनाने मोहफुल संकलन केंद्र सुरू केल्यास जगण्याचे साधन मिळू शकते. पारंपरिक शेती करणाऱ्या कुटुंबाना या व्यवसायातून उदरनिर्वाह करता येईल स्थानिक आमदारांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा - सर्वात जास्त दूध देणारी ही शेळी ठरतेय शेळीपालनात फायद्याची

टॅग्स :विदर्भशेतीशेतकरीपीक