Join us

Ranbhajya आला पावसाळा, खा आरोग्यवर्धक रानभाज्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 2:28 PM

पावसाळा सुरु झाला की, रानमाळावर व जंगलात उगवणाऱ्या रानभाज्या सहज उपलब्ध होतात. रानभाज्यांमध्ये भरपूर पोषणमूल्ये असतात.

पावसाळा सुरु झाला की, रानमाळावर व जंगलात उगवणाऱ्या रानभाज्या सहज उपलब्ध होतात. रानभाज्यांमध्ये भरपूर पोषणमूल्ये असून, आरोग्यवर्धक विविध गुणधर्मही आहेत, त्यामुळे या हंगामी भाज्यांना विशेष मागणी असते.

सर्दी, ताप, खोकला, पोटदुखी, वात, डोकेदुखीचा त्रास कमी करणाऱ्या काही रानभाज्या आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या भाज्यांमध्ये उपयुक्त गुणधर्म आहेत. वसई पूर्व भागात तुंगारेश्वर जंगलात रानभाज्या मोठ्या प्रमाणावर असून, या परिसरातील आदिवासी बांधव त्या विक्रीसाठी रहदारीच्या रस्त्यावर बसत असल्याने त्यांनाही याद्वारे रोजगाराचे साधन उपलब्ध होते.

रानभाज्या खा, ठणठणीत राहा■ टाकळा : सर्दी, ताप, खोकला यासारखे संसर्गजन्य आजार कमी करणारे गुणधर्म या भाजीत आहेत. अनेक त्वचाविकारांवरही ती प्रभावी आहेत.■ अंबाडी : या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, लोह, झिंक, भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ही भाजी नेत्रविकार दूर करण्यासह अशक्तपणा कमी करते.■ अळू : व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम या भाजीत भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे हृदयरोगाचा, कर्करोगाचा धोका कमी करतो.■ करटोली: प्रोटिन्स, आयर्न, अॅन्टिऑक्सिडंटस, फायबर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.■ लोत : पावसाळ्यात होणारे अपचन, पोटदुखी, वाताचा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त असून, मूळव्याधीचा त्रास कमी करते.

भाज्यांचे प्रकार जसे वेगवेगळे आहेत, त्याप्रमाणे प्रत्येक भाजीमध्ये मानवी शरीरासाठी उपयुक्त ठरणारे औषधी गुणधर्मही आहेत. ग्रामीण भागात या भाज्या सहज उपलब्ध होतात. मात्र, शहरवासीय विकत घेऊन या भाज्यांचा आस्वाद घेतात. पावसाळ्यातील चारच महिने या भाज्या उपलब्ध होत असल्याने शक्य तितक्यावेळी रानभाज्यांचा आस्वाद घेणे आवश्यक आहे - राजेश जोशी, आहार तज्ज्ञ

 

टॅग्स :भाज्याजंगलआरोग्यपालघरशेतकरी