Join us

Monsoon Rain : हरिणाच्या पिल्लांचा अन् पावसाचा काय आहे संबंध? प्राणी, पक्षी अन् झाडे कसा देतात पावसाचा संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 4:54 PM

निसर्गातील अनेक गुपिते मानवाला अजूनही उलगडलेली नाहीयेत.

निसर्ग आणि मानव हे या पृथ्वीतलावरील महत्त्वाचे घटक. मानवाच्या प्रगतीमुळे निसर्गाचे दिवसेंदिवस नुकसान होत आहे. पण निसर्गातील अनेक गुपिते मानवाला अजूनही उलगडलेली नाहीयेत. निसर्ग वातावरणात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे प्रतिबिंब कुठेतरी दाखवत असतो. भविष्यातील घडणाऱ्या घडामोडींचे संकेत हे निसर्गच दाखवत असतो. हंगामात किती पाऊस पडेल याचे संकेतसुद्धा निसर्गातच दडून बसलेले आहेत. अनेक गोष्टीतून निसर्ग पावसाचे संकेत देत असतो. त्याचप्रमाणे जुने लोकं कावळ्याच्या घरट्यावरून पावसाचे प्रमाण काढायचे हे आपल्याला माहितीये का?  चला तर जाणून घेऊयात. 

पाऊस येण्याच्या काही दिवसा अगोदर आकाशामध्ये चातक पक्षाची गर्दी दिसते अशी गर्दी दिसली की, लवकरच पाऊस येणार असा संकेत असतो. हरीण आणि वाघ हे प्राणी ज्या वर्षी कमी पाऊस पडण्याची शक्यता असते त्यावर्षी आपल्या पिलांना जन्म देतात असे म्हणतात. 

ज्या वेळेला काळ्या मुंग्या तोंडामध्ये पांढरी अंडी घेऊन जायला सुरुवात करतात त्यावेळेला लवकरच पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येते. वाळवीला पंख फुटून ज्या वेळेला या वाळव्या आकाशामध्ये उडतात त्यावेळेस लवकरच पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असते. 

चिंच चिंचेच्या झाडाला साधारणता मे महिन्याची सुरुवातीला मोहर येतो. परंतु, यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला चिंचेचा झाडाला मोहर आल्यामुळे यंदा पाऊस एक महिना उशिराने चांगला पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येते.

भावाचे झाड देशी वंशाच्या असलेल्या भावाच्या झाडाला ज्यावेळेला फळ येते त्यानंतर तीन महिन्यांनी पाऊस पडतो असेही संकेत असल्याचं बोललं जातं.

धामणी धामणीच्या झाडाला एप्रिल महिन्यामध्ये फुले आली तर जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचे संकेत असतात. मात्र यावर्षी धामणीच्या झाडाला मोहर हा मे महिन्याच्या शेवटच्या काही दिवसात आलेला आहे. त्यामुळे यंदा उशिरा पाऊस पडणार असल्याचे संकेत आहेत. 

पांढरफळी पांढरफळी या वनस्पतीचे फळ पिकायला लागल्यानंतर दहा ते पंधरा दिवस पाऊस पडण्याची संकेत असतात. पण यंदा पांढरफळी या झाडाला जास्त फळे लागली नाहीत असेही सांगण्यात येत आहे. 

(ही माहिती जुन्या-जाणत्या लोकांच्या माहितीनुसार दिलेली आहे. या माहितीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपाऊसपाणी