Join us

Mosambi : अख्ख्या गावाने काढून फेकल्या मोसंबीच्या बागा! भौगोलिक मानांकनप्राप्त मोसंबी होतेय झपाट्याने कमी

By दत्ता लवांडे | Published: October 07, 2024 5:03 PM

Sweet Lemon : जायकवाडी धरणाच्या पूर्वेकडे गोदावरी नदीच्या उत्तरेकडील भागात आणि धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे अंबड, घनसावंगी, पैठण या तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर  मोसंबीचे उत्पादन घेतात.

Sweet Lemon : महाराष्ट्रामध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्या मोसंबी उत्पादनाचे माहेरघर समजले जाते. पण येथील मोसंबी उत्पादक शेतकरी मागच्या काही दिवसांपासून निसर्गाचे दृष्टचक्रात सापडला आहे. त्यामुळे भौगोलिक मानांकन प्राप्त मोसंबीच्या बागा उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मोसंबीच्या हब समजल्या जाणाऱ्या या पट्ट्यातील बागा झपाट्याने कमी होत आहेत.

जायकवाडी धरणाच्या पूर्वेकडे गोदावरी नदीच्या उत्तरेकडील भागात आणि धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे अंबड, घनसावंगी, पैठण या तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर  मोसंबीचे उत्पादन घेतात. पण या हंगामातील अतिपाऊस, फळगळ आणि बाजारपेठेत मिळणारा कवडीमोल दर यामुळे मोसंबी उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. 

जालना जिल्ह्यातील घनसावंगी, अंबड तालुक्यातील शेतकरी मोसंबी उपटून फेकून देत आहेत. घनसावंगी तालुक्यातील आरगडेगव्हाण, मुर्ती, पिंपरखेड, कुंभार पिंपळगाव या गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी सर्व बागा काढून टाकल्या आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे आणि योग्य व्यवस्थापन करण्याची उर्मी आहे असे अनेक शेतकरी याच भागात मोसंबीची लागवड करताना दिसत आहेत.  

जालन्यात मोसंबी १७ ते १८ रूपये किलोने विक्री होते. तोच माल दिल्लीमध्ये ४५ रूपये किलोने विक्री होतो. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये कोणताच समन्वय नाही. आमचे नुकसान झाले तरीही कृषी सहाय्यक फक्त पंचनाम्यासाठी शेतात येतात असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.

का काढतायेत शेतकरी बागा?आमच्या अंबड तालुक्यामध्ये जवळपास ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागा काढून टाकल्याची माहिती आहे. फळगळीमुळे झाडाला फळच टिकत नसल्यामुळे एकरी फक्त २ ते ३ टन उत्पादन निघत नाही. बाजारात दरही १५ ते २० रूपयांच्या आत आहे त्यामुळे बागा काढाव्या लागत असल्याचं शेतकरी सांगतात. 

तोडगा निघेनामागील काही वर्षांपासून या भागांतील मोसंबी उत्पादकांना फळगळीचा सामना करावा लागतोय. कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन केंद्राच्या तज्ज्ञांकडून आणि शास्त्रज्ञांकडून सुचवलेले उपाय काहीच फायद्याचे ठरत नाहीत. पक्वतेला आलेली फळांचीसुद्धा गळ होत असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

गावातील ९० टक्के शेतकऱ्यांनी काढली मोसंबी

शेतकरी शेतात तणनाशकाची फवारणी करतात त्यामुळे जास्त फळगळ होते असा माझा अनुभव आहे. कारण मी शेतातील काही तणनाशक न फवारता तण कापून शेतातच टाकले. ज्या ठिकाणी हा प्रयोग केला तेथील झाडाची फळे चांगले होते. तर जिथे तणनाशक फवारले तेथील फळांची गळती झाली. पण बाजारात मला केवळ १४ रूपयांचा दर मिळाला. यामुळे आमच्या गावातील ९० टक्के शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागा काढून टाकल्या आहेत.- शिवस्वरूप शेळके (मोसंबी उत्पादक शेतकरी, जामखेड, अंबड, जि. जालना)

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमराठवाडा