पुणे : शेतकऱ्यांना आणि तरूणांना निर्यातीसंदर्भात माहिती व्हावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फक्त माल उत्पादित न करता निर्यातीमध्येही यावे या उद्देशाने "फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स" व "सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड", नाशिक ह्यांच्या संयुक्तिक विद्यमाने पुण्यात "कृषिमाल निर्यात परिषद" (Agri Export Conclave) आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, राज्यात अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणात तयार झाल्या पण त्यांना पुढे काय करायचे हे न समजल्यामुळे त्यापैकी बऱ्याच बंद पडल्या आहेत. अशा कंपन्यांना कृषीमाल निर्यातीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करण्यासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे व भविष्यात त्याला भरपूर वाव आहे. त्यांच्यासाठी ग्रामीण भागातील उच्चशिक्षित बेरोजगार, आय. टी, इंजिनिअर, कृषी पदवीधरांना निर्यात क्षेत्रात यशस्वी बनण्याची सुवर्ण संधी आहे. विशेष म्हणजे कमीत कमी भांडवलामध्ये 170 देशांमध्ये निर्यात करण्याच्या संधी उपलब्ध आहेत.
निर्यात व्यवसायामध्ये खूप Misconceptions, Misunderstandings, गैरसमज व काल्पनिक भीती आहेत. (उदा. फक्त सेंद्रियच माल निर्यात करता येतो. किंवा माझ्याकडे कमी माल आहे मी कशी निर्यात करू शकतो. माझी आर्थिक फसवणूक होईल का? वगैरे) पण दहा ग्रॅमच्या केशर पासून ते 40 फूट कंटेनर मध्ये 46 टनापर्यंत, तसेच कोथिंबिरीपासून जिवंत बोकडापर्यंत निर्यात करता येते.
निर्यातदार होण्यासाठी कोणत्या स्टेप्स आहेत?
-कंपनी तयार करणे. (Registration of Firm)
-कंपनीची व प्रॉडक्ट ची आकर्षक वेबसाईट व विविध व्हिडिओ तयार करणे.
-सरकारच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर नाव नोंदणी करून मेंबरशिप घेणे. ज्यामुळे तुम्ही जगाला दिसू शकता.
- APEDA (Agriculture & Processed Food Product Export Development Authority)
- DGFT (Directorate General of Foreign Trade)
- COO ( Common Digital platform for issuance of certificate of origin)
-प्रॉडक्ट निवडणे - तुमचा इंटरेस्ट, त्या भागातील उत्पादन, perishable / nonperishable वगैरे
-IEC- Importer - Exporter Code घेणे.
-EDC- जवळपासच्या Sea/Air port मध्ये रजिस्टर करणे.
त्याच बरोबर तुमच्या शेतमाल /प्रोसेसड प्रॉडक्ट साठी
- FSSAI Certificate
- फायटोसॅनिटरी (कीड रोगमुक्त प्रमाणपत्र). हे देण्याची सोय 12 जिल्ह्यामध्ये आहे.
- कीडनाशक उर्वरित अंश (Residue free) टेस्ट कराव्या लागतील.
-त्यानंतर ग्राहक Buyer शोधणे व त्यांची विश्वासार्हता, Reliability चेक करणे.
-आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून Proper Commercial Terms and Conditions चा अभ्यास करणे जरुरी आहे. उदाहरणार्थ 50% ऍडव्हान्स आणि 50% payment against LC लेटर ऑफ क्रेडिट वगैरे.
-सर्वात महत्त्वाची म्हणजे आपल्या मालाची किंमत ठरवणे, निगोसिएशन्स व प्रॉफिट ठरवणे. आपली क्वालिटी, ब्रँड व्हॅल्यू व hidden, contingency चार्जेस गृहीत धरावे लागतील.
वेगवेगळ्या कंडिशन्स असतात.
FOB - Free on Board
CFR - Cost & Fright
CIR- Cost, Insurances & Fright
Mode of Despatch ठरवणे
आपण भारताच्या सीमेलगत असलेल्या नेपाळ आणि भुतानला रोडने निर्यात करू शकतो. नेपाळ जवळपास 65 टक्के आयात भारताकडून करतो. काही ठिकाणी बाय ट्रेन आहे (किसान रेल), विमानाने, जहाजाने किंवा फ्रोजन कंटेनर, त्या प्रमाणे sea worthy पॅकिंग, प्रि- ट्रीटमेंट महत्त्वाची आहे. (उदाहरणार्थ, माल पोहचण्यासाठी दहा दिवस लागणार असतील तर कांद्याला रेडिएशन ट्रीटमेंट करतात.)
निर्यातदाराला वरील माहितीचा उपयोग देशांतर्गत म्हणजेच डोमेस्टिक एक्सपोर्ट (भारतातील 141 कोटी ग्राहक) व आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी म्हणजेच इंटरनॅशनल एक्सपोर्टसाठी होऊ शकतो.
उदाहरणार्थ, जसे एनजीओ साठी ऑडिट करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट असतो. किंवा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी कंपनी सेक्रेटरी असतो. तसे एक्सपोर्टचे सर्व रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंटेशन, प्रोसेस करण्यासाठी 'सिंगल विंडो ऑथॉरिटी'ची जरुरी आहे. प्रत्येकाला या सगळ्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही.
- सतीश देशमुख, B.E. (Mech.), पुणे (अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स)
Coordinator- Task Force Sugar Core Committee (समन्वयक, टास्क फोर्स शुगर कोअर कमिटी)
Coordinator, Executive Steering committee for Carbon Credit (For farmers)
समन्वयक, दूध संघर्ष महाअभियान