Join us

कृषी सेवा पदांच्या परीक्षेसाठी एमपीएससीकडून प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 16:43 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) संयुक्त पूर्व परीक्षेत (२०२४) कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षेत (२०२४) कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे कृषी सेवेतील २५८ पदे ही त्यात समाविष्ट झाली असून, १ डिसेंबरला होणाऱ्या या परीक्षेसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. यापूर्वी कृषी सेवेतील पदांचा समावेश संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये करण्याची मागणी स्पर्धा परीक्षार्थीनी केली होती. त्यासाठी पुण्यात आंदोलनही करण्यात आले होते.

यामुळे राज्य शासनाने नियोजितपरीक्षा पुढे ढकलण्याची विनंती एमपीएससीला केली. या पार्श्वभूमीवर आयोगाच्या बैठकीत या २५८ पदांचा समावेश संयुक्त पूर्व परीक्षेत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

'या' लिंक वर क्लिक करून आजच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा, आणि मिळवा सर्व अपडेट सर्वात आधी अगदी मोफत.

टॅग्स :शेती क्षेत्रएमपीएससी परीक्षासरकारपुणेपरीक्षा