पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA) विपणन हंगाम २०२५-२६ मध्ये सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत मूल्यात (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली.
उत्पादकांना त्यांच्या शेत मालासाठी योग्य भाव मिळावा, यासाठी सरकारने विपणन हंगाम २०२५-२६ साठी रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली आहे.
मोहरीसाठी ३०० रुपये प्रति क्विंटल आणि त्यापाठोपाठ कडधान्य (मसूर) २७५ रुपये प्रति क्विंटल दराने एमएसपीमध्ये निव्वळ सर्वाधिक वाढ जाहीर करण्यात आली.
हरभरा, गहू, सूर्यफूल आणि बार्ली या पिकांच्या एमएसपी मध्ये अनुक्रमे २१० रुपये प्रति क्विंटल, १५० रुपये प्रति क्विंटल, १४० रुपये प्रति क्विंटल आणि १३० रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करण्यात आली.
विपणन हंगाम २०२५-२६ मधील सर्व रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमती (रु. प्रति क्विंटल)
अ.क्र. | पिकाचे नाव | २०२५-२६ | २०२४-२५ | वाढ |
१ | गहू | २,४२५ | २,२७५ | १५० |
२ | बार्ली | १,९८० | १,८५० | १३० |
३ | हरभरा | ५,६५० | ५,४४० | २१० |
४ | मसूर | ६,७०० | ६,४२५ | २७५ |
५ | मोहरी | ५,९५० | ५,६५० | ३०० |
६ | करडई | ५,९४० | ५,८०० | १४० |
संपूर्ण खर्च. यात शेतमजुरी, बैलांची मजुरी/यंत्रांचा खर्च, भाडेतत्वावरील जमिनीचे भाडे, बियाणे, खते, कीटकनाशके, सिंचन खर्च, अवजारे आणि शेत इमारतींवर घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, पंप चालवण्यासाठी डीझेल/वीज हा सर्व खर्च, आणि विविध आणि कुटुंबाचे श्रम हा सर्व खर्च समाविष्ट आहे.
विपणन हंगाम २०२५-२६ साठी अनिवार्य रब्बी पिकांसाठी एमएसपीमधील वाढ केंद्रीय अर्थसंकल्प २०१८-१९ मधील, देशभरातील पिकांच्या सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान १.५ पट पातळीवर एमएसपी निश्चित करण्याच्या घोषणेला अनुसरून आहे.
देशभरातील भारित सरासरी उत्पादन खर्चापेक्षा अपेक्षित फरक, गव्हासाठी १०५ टक्के, त्यापाठोपाठ रेपसीड आणि मोहोरी ९८ टक्के, डाळी ८९ टक्के, हरभरा ६० टक्के, बार्ली ६० टक्के, आणि सूर्यफूल ५० टक्के इतका आहे.
रब्बी पिकांच्या वाढलेल्या एमएसपीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला फायदेशीर भाव मिळेल आणि पिकांमधील विविधतेला प्रोत्साहन मिळेल.