Join us

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेसाठी रांगा, शेतकऱ्यांना मजूर महिला मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 11:18 AM

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागात महिलांच्या रांगा लागल्याने सध्या शेतकऱ्यांना मजूर महिला मिळण्यात अडचणी येत आहेत.

राज्यातील महिलांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024) जाहीर केली आहे. या योजनेस पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. दरम्यान, सध्या या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे मिळवण्यासाठी सध्या वणी तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांची तलाठी आणि तहसीलदार कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे. पेरणीच्या दिवसात शेतमजूर महिला या शेतीकाम सोडून कागदपत्रे गोळा करण्यात व्यस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांचा शेतात पेरणी, निंदणी आणि खत देण्यासाठी शेतमजूर महिला मिळेनाशा झाल्या आहेत.

या योजनेचे निकष पूर्ण करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतात. ही कागदपत्रे जमा करण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांची तलाठी आणि तहसीलदार कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली आहे. एन पेरणीच्या दिवसात शेतमजूर महिला या शेती काम सोडून कागदपत्र गोळा करण्यात व्यस्त झाल्याने शेतकऱ्यांचा शेतात पेरणी, निंदणी आणि खत देण्यासाठी शेतमजूर महिला मिळेनाशा झाल्या आहेत. शेतीची कामे रखडली गेल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

लाडकी बहीण योजना, असे झाले बदल या योजनेत अर्ज करण्याची मुदत १ जुलै ते १५ जुलैपर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना १ जुलैपासून दरमाह दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी १५ वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला. या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

टॅग्स :सरकारी योजनाखरीपशेती