Lokmat Agro >शेतशिवार > Mulching paper : मल्चिंग पेपर ठरतोय पिकांना फायदेशीर 

Mulching paper : मल्चिंग पेपर ठरतोय पिकांना फायदेशीर 

Mulching paper : Mulching paper is beneficial to crops  | Mulching paper : मल्चिंग पेपर ठरतोय पिकांना फायदेशीर 

Mulching paper : मल्चिंग पेपर ठरतोय पिकांना फायदेशीर 

Mulching paper : पारंपरिक शेती केल्याने शेतीतून उत्पन्न कमी आणि कष्ट व खर्च जास्त होत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आधुनिक शेतीमध्ये मल्चिंग पेपरचा वापर करून पिकांना जीवनदान देण्याचे काम करत आहेत.

Mulching paper : पारंपरिक शेती केल्याने शेतीतून उत्पन्न कमी आणि कष्ट व खर्च जास्त होत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आधुनिक शेतीमध्ये मल्चिंग पेपरचा वापर करून पिकांना जीवनदान देण्याचे काम करत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

Mulching paper : 

सोपान कोठाळे :

 सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरातील अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. भाजीपाल्यासह इतर पिकांसाठी शेतकरी मल्चिंग पेपरचा वापर करत असून या पेपरमुळे जमिनीत तणाची वाढ होत नसून पिकांसाठी पाणीदेखील कमी लागत आहे. परिणामी, हा पेपर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

पारंपरिक शेती केल्याने शेतीतून उत्पन्न कमी आणि कष्ट व खर्च जास्त होत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आधुनिक शेती करण्याकडे वळले आहेत. 
शेतात तण वाढू नये, पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये, त्यासाठी पिकाचे संरक्षण व्हावे, पाणी कमी लागावे,  शेतीतून अधिक उत्पन्न मिळावे, याकरिता सद्य: स्थितीत शेतकरी मल्चिंग पेपरवर कपाशी पिकाची लागवड करत आहेत.
बदलत्या वातावरणावर उपाययोजना करताना दिसून येत आहेत. केळगावसह आमठाणा, शिंदेफळ परिसरातील शेतकरी मिरची, कापूस यासारख्या पिकाला संरक्षण मिळावे म्हणून मल्चिंग पेपरचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. 

मल्चिंगचे बंडल मिळते चौदाशेला
मल्चिंग पेपरच्या एका बंडलची किंमत बाजारात १ हजार ४०० रुपये असून त्याचा वापर मिरचीच्या एक हजार रोपांसाठी केला जातो. या रोपासाठी पाच गुंठे शेती लागते. हा पेपर महाग जरी असला तरी मिरचीचे उत्पन्न वाढत असल्याने ते खरेदी करण्यास शेतकऱ्यांना परवडत आहे.
मल्चिंग पेपरमुळे पिकातील खुरपणीच्या खर्चात मोठी बचत होते. त्याला हाताने खत टाकण्याची गरज नसते. त्यामुळे मजुरीचा खर्च वाचतो. 
या पेपरमुळे तापमान आणि आर्द्रतेवर नियंत्रण राहत असल्याने पीक वाढीला मोठा फायदा होतो. अधिक पाऊस झाला तरी त्याचा फारसा परिणाम या पिकावर होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या पेपरची मागणी बाजारात दिवसेंदिवस वाढत आहे. 
उन्हाळ्यामध्ये पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे पाण्याची कमतरता शेतकऱ्यांना भासत असते. त्यामुळे अनेक शेतकरी या पेपरचा पिकासाठी वापर करत आहेत.

खत देण्यास सोपे जाते
या पेपरमुळे ड्रीपद्वारे पिकास खत सोडण्यास सोपे जात असून खर्चाची बचत होते. पिकाची उगवण्याची क्षमता साधारण्यास मदत मिळते.
- सागर पंडित, शेतकरी, शिंदेफळ 
 

Web Title: Mulching paper : Mulching paper is beneficial to crops 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.