Join us

नाफेडने घटविले कांद्याचे दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2023 11:49 AM

सरकारने नाफेडमार्फत २,४१० रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या खरेदीच्या अटी शर्तीबाबत शेतकऱ्यांत रोष असताना आता नाफेडने कांद्याचे दर तब्बल १३६ रुपयांनी घटविल्याने बळीराजाच्या असंतोषात आणखीनच भर पडली आहे.

केंद्र सरकारनेकांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याच्या वर्गातून निर्णयावर शेतकरी तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच सरकारने नाफेडमार्फत २,४१० रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या खरेदीच्या अटी शर्तीबाबत शेतकऱ्यांत रोष असताना आता नाफेडने कांद्याचे दर तब्बल १३६ रुपयांनी घटविल्याने बळीराजाच्या असंतोषात आणखीनच भर पडली आहे.

कांद्याच्या बाजारभावात चढ-उतार होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने घोषणा करताच नाफेड केंद्रावर कांदा खरेदीला सुरुवात झाली. नाफेडमार्फत खरेदी केलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल २ हजार ४१० रुपये भाव मिळाला. मात्र, हा दर परवडणारा नाही. तीन ते साडेतीन हजार रुपये भाव हवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, कांदा चाळीत सडण्यापेक्षा विकलेला बरा, या मानसिकतेतून शेतकऱ्यांनी केंद्रावर नाफेड आणि गर्दी केली.

नाफेड एनसीसीएफच्या माध्यमातून दोन लाख मेट्रिक टन कांदा २,४१० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याची घोषणाही झाली. आतापर्यंत साडेसात हजार टन कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यात आला; परंतु गुरुवारी अचानक नाफेडने कांद्याचा दर १३६ रुपयांनी घटविला. २,२७४ रुपये ८३ पैसे दराने कांदा खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

टॅग्स :कांदापुणे कृषी उत्पन्न बाजार समितीपीकनाशिकखरीपकेंद्र सरकार