Join us

Nagpanchami : नाग आणि मुंग्यां याचं सहजीवन म्हणजे वारूळ कसं? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 10:58 AM

नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. वारुळाजवळ नैवेद्य ठेवला जातो. यामागे महत्त्वाचे कारण आहे. पावसाळ्यात मुंग्यांना Varul वारुळाबाहेर जाता येत नाही, त्यांना खाद्य मिळावे म्हणून हा नैवेद्य असतो.

नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. वारुळाजवळ नैवेद्य ठेवला जातो. यामागे महत्त्वाचे कारण आहे. पावसाळ्यात मुंग्यांना वारुळाबाहेर जाता येत नाही, त्यांना खाद्य मिळावे म्हणून हा नैवेद्य असतो.

वारुळात नाग आणि मुंग्या यांचे सहजीवन असते. यातून मुंग्या नागोबाकडून 'झेड' सिक्युरिटीच घेत असतात. दोघांना जपण्याची गरज आहे. जिवंत नागाला दूध देऊ नका, वारूळ नष्ट करू नका," असे आवाहन पर्यावरण अभ्यासक डॉ. महेश गायकवाड यांनी केले.

नागपंचमी शुक्रवारी (दि. १) साजरी होत आहे त्यानिमित गायकवाड यांनी या सणाची परंपरा सांगितली. ते म्हणाले, पंचमीच्या आदल्या दिवशी उपवास धरायचा आणि वारुळाला जायचे सोबत ज्वारीच्या लाह्या, दूध, हळदीकुंकू, दोरा, फुल वाहून वारुळाची मनोमन पूजा करायची.

या सणात वारुळातील काही रिकामी बिळ असतात, त्याच्यामध्ये दूध ओतायचं आणि पूजा करायची अशी प्रथा आहे, मात्र हे दूध मुंग्यांना उपयोगी पडतं हे यातलं शास्त्रीय कारण, दिंडं हा नैवेद्य नागोबाला ठेवतात. कारण मगच नागोबा प्रसन्न होतो, अशी काहीशी भाबडी कल्पना आहे, मात्र यात शास्त्र खूपच मोठे आहे हेच दिंडे मुंग्या खूप आवडीनं खातात.

"जैवविविधतेला वाचविणारी नागपंचमी वारुळे, मुंग्या, सापांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने पूर्वजांनी सुरू केलेली नागपंचमी. आजचा शिक्षित पण बिनडोक मानव यातून काहीच बोध घेताना दिसून येत नाही.

आपण नागपंचमी सण साजरा करताना खऱ्या नागाची पूजा करतो. पूर्वी लोक मातीचे नाग करून त्याची पूजा करायचे, मुंग्या व वाळवी खूप वेगवेगळ्या प्रकारची वारुळे बांधतात अगदी किल्लेच तयार करतात.

हे किल्ले अर्थात वारुळे तयार करताना आपल्या तोंडातील आम्लयुक्त लाळेचा उपयोग करून जमिनीखालील मातीचा प्रत्येक कण आणि कण उकरून वरील बाजूस आपल्याला दिसणारे वारूळ तयार करतात.

आता पावसाळ्यात चुकून जर वारुळाची माती वाहिली तर या मातीच्या नागाची माती वापरून मुंग्या डागडुजी करतात, म्हणून मातीचा नाग लोक करायचे, या वारुळात साप कधीतरी राहतो आणि मग शेतकरी किवा एखादा वाटसरू अशी घटना पाहतो आणि मग हे वारूळ नागाचे किंवा सापाचे आहे असे जगजाहीर केले जाते.

खाद्य मिळावे म्हणून तजवीज साप दूध पीत नाही किंवा शाकाहार करीत नाही, हेही त्यांना पक्के माहीत होते, मात्र तरीही त्यांनी वारुळापुढे लाह्या, साखर, बत्ताशे, शेंगदाणे, तांदूळ, दूध, दही असे नानाविध शाकाहारी पदार्थ वारुळापुढे ठेवले जातात, हे तर सर्व अन्न फक्त मुंग्यांचे आहे. म्हणजे पावसाळ्यात मुंग्यांना खाद्य मिळावे म्हणून ही तजवीज केल्याचे दिसून येते. असे गायकवाड म्हणाले.

सापांना व मुंग्यांना वाचविणे हे महत्त्वाचे कार्य आपल्या पूर्वजांनी खूप कल्पकतेतून केले आहे. आपणही पुढे हा वसा चालू ठेवूयात. फक्त मातीच्या नागाची पूजा करावी. - डॉ. महेश गायकवाड, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :नागपंचमीसापशेतीपर्यावरणशेतकरी