Join us

Namo Drone Didi Yojana : शेती क्षेत्रातही महिला प्रगती करून साधतील आर्थिक उन्नती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 20:42 IST

Namo Drone Didi Yojana : या योजनेचा भाग म्हणूनच महिलांसाठी 'नमो ड्रोन दीदी योजना' (Namo Drone Didi Yojana) केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना ड्रोन उडवणे, डेटा विश्लेषण करणे, ड्रोनची दुरुस्ती करणे या संबंधित प्रशिक्षण देण्यात येत आहे.

बाळकृष्ण रासने

'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी' असे म्हटले जाते. ते चुकीचे नाही. कारण, आजची स्त्री चूल व मुलांपर्यंत मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खादा लावून काम करीत आहे.

देशभरातील महिलांना सामाजिक आणि आर्थिक स्तरावर सक्षम बनवण्यासाठी भारत सरकारने अनेक अप्रतिम योजना सुरू केल्या आहेत. या योजनेचा भाग म्हणूनच महिलांसाठी 'नमो ड्रोन दीदी योजना' (Namo Drone Didi Yojana) केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना ड्रोन उडवणे, डेटा विश्लेषण करणे, ड्रोनची दुरुस्ती करणे या संबंधित प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. या योजनेचा उद्देश कृषी खर्च कमी करून उत्पादन वाढवणे हा असा आहे.

आज ग्रामीण भागातही महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. त्याचाच प्रत्यय हसनाबाद येथे आला असून, जयश्री रजाळे ही महिला ड्रोन पायलट म्हणून काम पाहणार आहे. त्यामुळे शेती क्षेत्रातही ७५० महिला प्रगती करून आर्थिक उन्नती साधणार आहे.

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद व परिसरात २७ जुलै २०२१ रोजी १० के कार्यक्रमांतर्गत नाबार्डच्या सहकार्याने सेंट्रल सेक्टर स्कीम (CSS) अंतर्गत एफपीओची नोंदणी करण्यात आली. या उपक्रमाची अंमलबजावणी करणारी संस्था वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) असल्याचे सांगण्यात आले.

७५० जणींना मिळणार रोजगार

६ महिने या ड्रोनचे चालक म्हणून महिलाच काम पाहणार आहेत. त्यामुळे सहा महिन्यांत या महिलांची ओळख ड्रोन पायलट म्हणून होणार आहे.

तिघांना पाच दिवसांचे प्रशिक्षण

ड्रोन चालवण्याचे तीन जण काम करणार आहेत. यात एक मुख्य पायलट महिला आणि दोन को-पायलट राहणार आहेत. त्यामध्ये एक महिला व एक पुरुष आहे. या तिघांना फलटण येथे पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

त्यामुळे या परिसरातील ७५० सदस्य महिलांना फायदा होणार आहे. यात एका एकरच्या औषधी फवारणीसाठी ५०० आकारण्यात येणार आहे. त्यामुळे या महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

५०१ भागधारकांपासून सुरूवात

जी क्लस्टर-बेस्ड बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणून काम करते. संत दयानंद शेतकरी उत्पादक कंपनीचे ५०१ भागधारकांपासून सुरुवात केली.

आता १,४९५ सदस्य आहेत. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी खडकी येथे संत दयानंद शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाने व वालमार्टच्या सहकार्याने प्रो-राइस प्रकल्पांतर्गत ड्रोन देऊन त्याचे उद्घाटन व डेमो देण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

हे ही वाचा सविस्तर : Daisy Flower: युवा दाम्पत्याने शेतात चमकली 'या' फुलांची 'बिजली'!

टॅग्स :कृषी योजनाशेती क्षेत्रशेतकरीशेतीमहिला आणि बालविकासमहिला