नवरात्री हा नऊ दिवसांचा हिंदू सण उत्सवाचा, आनंदाचा, परमात्म्याशी आध्यात्मिक संबंध शोधण्याचा उपवास, विस्तृत पूजा पंडाल, गरचा नृत्य, पारंपरिक पोशाख आणि बरंच काही करण्याचा काळ जो देशभरातील लोक साजरा करतात.
नवरात्रीच्या आणखी एक पैलूची ओळख जाणून घेऊया. मार्कंडेय पुराणानुसार अशा नऊ वनस्पती ज्या निरनिराळ्या रोगांना बरे करतात तशाच आयुर्वेदातही औषधी वनस्पतीमध्ये नवदुर्गा आहेत.
१) 'शैलपुत्री' म्हणजेच हरड किंवा हिरडा ही वनस्पती 'पहिली' दुर्गा म्हणून हिचं स्थान महत्त्वाचे आहे आणि ही वनस्पती ७ प्रकारची असते, हरितिका किंवा हरी ही भय किंवा भीती घालवते, पथ्य ही शरीराला हितकारक आहे, कायस्थ ही शरीराला सुदृढ करते, अमृता ही अमृतासमान आहे, हेमावती ही हिमालयावर असणारी, चेतकी ही चित्त प्रसन्न करणारी, श्रेयसी यश देणारी, शिवा ही कल्याणकारक आहे. हिरडा ही वनस्पती औषध म्हणून उपयोगी आहे.
२) ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्राह्मी ही वनस्पती आयुर्मान वाढवते. या दुसन्या वनस्पतीमुळे स्मरणशक्ती वाढते. ही रक्तदोषांना संपवते आणि स्वर मधुर करते. माणूनच ब्राह्मीला सरस्वतीही म्हटलं जातं. ही मन आणि मेंदूला मजबूत करण्याचं काम करते. जठर आणि लघवी संबंधित व्यार्थीना शरीरातून बाहेर टाकते.
३) तिसरी 'चंद्रघंटा' म्हणजेच चंद्रशूर किंवा चमसूर वनस्पती कोविविरीसारखी दिसते. ज्याच्या पानांची भाजी करतात. जी खूप पौष्टिक असते. ही वनस्पती लठ्ठपणा कमी करते म्हणून हिला चर्मर्हती असंही म्हणतात. शक्तिवर्धक, हृदयरोगाला बरे करणारी अशी ही तिसरी महत्वाची चंद्रिका वनस्पती आहे.
४) दुर्मीळ वनस्पती 'कुष्मांडा' म्हणजेच कोहळा ही चौथी वनस्पतीदेखील अत्यंत महत्त्वाची आहे. कोहळ्यापासूनच पेठा ही मिठाई केली जाते. कोहळा शरीरातील बळ वाढवतो, रक्ताचे विकार बरे करतो, पोट साफ ठेवतो. जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचलेली आहे, त्यांच्यासाठी कोहळा हा अमृतासमान आहे. हा शरीरातील दोषांना दूर करत हृदयरोग बरा करतो. पित्ताचा त्राससुद्धा वरा होतो.
५) 'स्कंदमाता' म्हणजेच अळशी किंवा जवस वात, पित्त, कफ अशा व्याधींचा नाश करणारी ही पाचवी वनस्पती आहे. आहारामध्ये जवसाचा समावेश त्वचेसाठी उपकारक ठरतो. जवसच्या नियमीत सेवनाने रक्तातील साखर, ट्रायग्लिसराईड्स, हिमोग्लोबिन आणि
६) कोलेस्टेरॉल आटोक्यात राहू शकतात. 'कात्यायनी' म्हणजेच अंबाडी अंबा, अंचिका, अंबालिका, माचिका अशा वेगवेगळ्या नावांनी अंबाडी ओळखली जाते.
७) पित्त, कफ तसेच गळ्याच्या आजारांना बरी करणारी ही सहावी औषधी वनस्पती आहे. 'काळरात्री' म्हणजेच नागदवण ही सातवी वनस्पती सर्व प्रकारच्या रोगांचा नाश करते, यातून मन आणि मेंदूचे विकार बरे होतात. या वनस्पतीची लागवड घरी करावी. ही वनस्पती घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकत घराला सौख्य मिळवून देते. ही सर्व प्रकारच्या विषावरही उपयुक्त आहे.
८) 'महागौरी' म्हणजेच तुळस ही एक सर्वांच्या ओळखीची आठवी औषधी वनस्पती आहे. ही प्रत्येक घरात लावली जाते. तुळस सात प्रकारची असते, पांढरी, काळी, मरुता, दवना, कुढेरक, अर्जक, पटपत्र ही 'आठवी' वनस्पती सर्व प्रकारे रक्तशुद्ध करते व हृदयरोगावर हितकारक आहे.
९) 'सिद्धिदात्री' म्हणजेच शतावरी, हिला नारायणी असेही म्हणतात. शतावरी वनस्पती बुद्धिबलवर्धक तसेच वीर्यासाठी उत्तम अशी औषधी वनस्पती आहे, रक्तविकार तसेच वातपित्त दोषनाशक आहे. हृदयाला बळ देणारी महाऔषधी वनस्पती आहे. शतावरी वनस्पतीचे नियमानुसार सेवन केल्याने सर्व प्रकारचे कष्ट दूर होतात. हीनवमी वनस्पती आहे.
अशा या नऊ औषधी वनस्पतींचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास नवदुर्गाची आराधना म्हणजेच निरोगी आयुष्य, नवरात्रीचा सण, परंपरा आणि अध्यात्माने नटलेला आहे जो आपल्याला आपल्या जीवनातील सर्व पैलूंमध्ये निसर्गाचे महत्त्व समजण्यास मदत करतो. या औषधी वनस्पती, विविध स्वरूपात महत्वाची भूमिका बजावतात, ज्यामुळे लोकांना जीवनाचे सार, प्रजनन आणि देवी स्त्रीत्व साजरे करण्याची आणि आत्मसात करण्याची संधी मिळते.
- धनश्री ठाकरेवनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ