Lokmat Agro >शेतशिवार > समुद्रात वाहून जाणारे पाणी वाया जाण्याऐवजी साठवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार

समुद्रात वाहून जाणारे पाणी वाया जाण्याऐवजी साठवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार

New options are being considered to store water flowing into the sea instead of wasting it. | समुद्रात वाहून जाणारे पाणी वाया जाण्याऐवजी साठवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार

समुद्रात वाहून जाणारे पाणी वाया जाण्याऐवजी साठवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार

समुद्रात वाहून जाणारे पाणी वाया जाण्याऐवजी साठवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार राज्य सरकार करणार असून त्याकरिता एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

समुद्रात वाहून जाणारे पाणी वाया जाण्याऐवजी साठवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार राज्य सरकार करणार असून त्याकरिता एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई : समुद्रात वाहून जाणारे पाणी वाया जाण्याऐवजी साठवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार राज्य सरकार करणार असून त्याकरिता एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक समितीचे अध्यक्ष असतील. या समितीला दोन महिन्यांत अहवाल सरकारला द्यावा लागणार आहे.

कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. पण भौगोलिक परिस्थितीमुळे हे गोडे, पिण्यायोग्य पाणी पश्चिमवाहिनी नद्यांमधून समुद्रात वाहून जाते.

कोयना जलविद्युत, भंडारदरा आदी जलाशयांच्या उर्ध्व बाजूला असलेल्या गावांनादेखील जलाशयातील पाणी पातळी कमी झाल्याने पाण्याची टंचाई जाणवत असते.

त्यामुळे पावसाळी हंगामात उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून त्या भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बुडीत बंधारे किंवा बंधाऱ्यांची श्रृंखला किंवा बलून बंधारे बांधण्याच्या पर्यायावर शासन विचार करत आहे. त्या संदर्भातच आता समिती स्थापन करण्यात आली आहे.

सूचना दिल्या होत्या त्यानुसार आता..
१) मूळ धरणाच्या पाणी वापराला बाधा येणार नाही असे निकष ठरविण्यात येतील. बंधारे बांधण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरायचे, हेदेखील समिती सुचविणार आहे.
२) यासाठी आधी एक समिती नेमण्यात आली होती. ५ मार्च २०२० रोजी या समितीने अहवालदेखील सादर केला होता. मात्र हा अहवाल स्वीकारण्यात आला नाही.
३) देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतानाच्या काळात त्यांनी पुन्हा एकदा समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार आता ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

अधिक वाचा: E Peek Pahani : ई पिक पाहणीसाठी राज्यात शेतकरी व कॉलेजकुमारांचा नवा पॅटर्न होतोय पॉप्युलर; वाचा सविस्तर

Web Title: New options are being considered to store water flowing into the sea instead of wasting it.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.