भारत सरकारची सॉव्हरिन गोल्ड बाँडची म्हणजे सुवर्ण रोख्यांची मालिका-४ येत्या १२ फेब्रुवारी रोजी खुली होणार आहे. या योजनेत नागरिकांना स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी मिळू शकते. सरकार सॉव्हरिन गोल्ड बाँड मालिकेत अधूनमधून रोख्यांची विक्री करीत असते. हे रोखे गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय समजले जातात, या रोख्यांची खरेदी करून नफाही कमावता येऊ शकतो.
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना २.५ टक्के व्याज मिळते. एसजीबीमध्ये सोन्याच्या शुद्धतेच्या बाबतीत कोणताही धोका नसतो. प्रत्यक्ष बाजारातील सोने खरेदीत शुद्धतेबाबत नेहमीच धोका असू शकतो. मिळालेले सोने कमी शुद्धतेचेही असू शकते. ग्रामीण भागात शेतकरी बांधवांना सोने घरात ठेवणे कठीण जाते त्याचे प्रमुख कारण चोरांची भीती त्यामुळे हा पर्याय त्यांना उत्तम ठरू शकतो.
कसे घेणार सुवर्ण रोखे?■ यासाठी सर्वप्रथम आपल्या नेट बँकिंग खात्यावर लॉग इन करा. मेन मेन्यूमधून ई-सर्व्हिस' पर्याय निवडा.■ सॉव्हरिन गोल्ड बाँडवर क्लिक करून नोंदणी पूर्ण करा. डिपॉजिटरी पार्टिसिपेंटसाठी एनएसडीएल अथवा सीडीएसलवरील तपशील वाचा.■ नोंदणी अर्ज भरल्यानंतर 'खरेदी' टॅबवर क्लिक करा, सब्स्क्रिप्शनचे प्रमाण आणि नॉमिनी तपशील भरा.■ फोनवर आलेला ओटीपी भरा.