रसायनांच्या अतिवापरामुळे होणारा पर्यावरणाचा -हास निश्चितपणे थांबवता येऊ शकतो. त्यासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पद्धतीमधील शिफारशींचा अवलंब सर्वांनी करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. त्या पद्धतीमधील अत्यंत महत्त्वाचा व तितकाच प्रभावी उपाय म्हणजे निंबोळी अर्क होय. निंबोळी अर्कामुळे नैसर्गिक पद्धतीने रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य होते.
गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांचा अति वापर झाल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय पोत ढासळला गेला आहे. ज्यामुळे मातीची सुपीकता कमी झाली आहे.
फवारणीमुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. तसेच पिकावरील मावा, अमेरिकन बोंडअळ्या, तुडतुडे, पाने खाणाऱ्या अळ्या, देठ कुरतडणारी अळी, फळमाशा व खोडकीड अशा किडींवर त्याचा प्रभाव पडतो. तसेच फवारणीमुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. रासायनिक औषधांच्या फवारणीमुळे आरोग्यास अपाय होण्याची शक्यता असते. यामुळे निंबोळी अर्क फायदेशीर ठरते.
पिकावरील किडींच्या नियंत्रणासाठी महागडी रासायनिक कीटकनाशके किवा ज्यांच्या गुणवत्तेबाबत फारशी खात्री देता येणार नाही, अशी सेंद्रिय उत्पादने बाजारातून खरेदी करण्यापेक्षा निसर्गतः उपलब्ध असलेल्या निबोळीच्या वापरामुळे अगदी अल्प खर्चात घरच्या घरी प्रभावी नैसर्गिक कीटकनाशक तयार होते. - भरत नागरे, मंडळ कृषी अधिकारी, गोलापांगरी, ता. जि. जालना.
हेही वाचा - शेतकरी बांधवांनो या पिकांवर कीटकनाशक फवारणी नको!