Lokmat Agro >शेतशिवार > लक्ष द्या.. आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही

लक्ष द्या.. आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही

Note that Aadhaar card will no longer be accepted as proof of date of birth | लक्ष द्या.. आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही

लक्ष द्या.. आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही

जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही, असे भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) नुकतेच जाहीर केले आहे. त्यासाठी ईपीएफओने एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, आधार कार्डला जन्मतारखेच्या पुराव्याच्या सूचीतून हटविण्यात आले आहे.

जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही, असे भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) नुकतेच जाहीर केले आहे. त्यासाठी ईपीएफओने एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, आधार कार्डला जन्मतारखेच्या पुराव्याच्या सूचीतून हटविण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही, असे भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) नुकतेच जाहीर केले आहे. त्यासाठी ईपीएफओने एक अधिसूचना जारी केली आहे.
या अधिसूचनेनुसार, आधार कार्डला जन्मतारखेच्या पुराव्याच्या सूचीतून हटविण्यात आले आहे. त्यामुळे आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून ईपीएफओच्या कुठल्याही नोंदीत स्वीकारले जाणार नाही. ईपीएफओच्या या निर्णयाचा परिणाम कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांवर होणार आहे. या निर्णयानंतर ईपीएफओ सदस्यांना जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधारकार्डचा वापर करता येणार नाही.

आधारचा उपयोग तरी काय?
आधार हे व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम करते. इतर कामासाठी त्याचा वापर करता येत नाही.

अधिक वाचा: सेवानिवृत्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतनात वाढ, किती मिळणार पेन्शन

जन्मतारखेचा ग्राह्य पुरावा कोणता?
आधार कार्डला सूचीमधून बाहेर काढल्यानंतर पुढील दस्तावेज जन्मतारखेचा पुरावा म्हणून वापरता येतील
- जन्मदाखला
- मान्यताप्राप्त शाळेचे गुणपत्रक
- शाळा सोडण्याचा दाखला

का घेण्यात आला हा निर्णय?
सूत्रांनी सांगितले की, आधार कायदा २०१६ मध्ये आधार कार्डला जन्मतारखेचा पुरावा म्हणून मान्यता देण्यात आलेली नाही तरीही अनेक ठिकाणी त्याचा जन्मतारखेसाठी वापर होत होता. ही बाब आधार प्राधिकरणाच्या लक्षात आल्यानंतर प्राधिकरणाने ईपीएफओला यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यानुसार, ईपीएफओने हा निर्णय जाहीर केला आहे.

Web Title: Note that Aadhaar card will no longer be accepted as proof of date of birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.