राज्यभरात मागील चार आठवड्यांपासून पावसाने चांगलीच ओढ दिल्याचे चित्र असून जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी गवताचा लिलाव न करण्याच्या सूचना वन विभागाला देण्यात आल्या आहेत.
राज्यातील पर्जन्यमान आणि संभाव्य परिस्थिती च्या उपाययोजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वनविभागाने गवताचा लिलाव न करता ते राखीव ठेवून त्याच्या पेंढ्या करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी साऱ्याच्या उत्पादन वाढीसाठी जिल्हा नियोजन विकास निधीतून शेतकऱ्यांना बियाणांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच कमी पावसामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी तातडीने निधी खर्च करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
राज्यात यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली असून खरिपाच्या पेरण्या धोक्यात आल्या आहेत. धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. परिणामी जनावरांसाठी चाऱ्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर गवताचा लिलाव न करता त्याचा साठा करून पेंढ्या करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.