Lokmat Agro >शेतशिवार > आता वीज जाणार असेल तर मिळणार मोबाइलवर सूचना; मोबाइल नोंदणी केली का?

आता वीज जाणार असेल तर मिळणार मोबाइलवर सूचना; मोबाइल नोंदणी केली का?

Notification will be given if there is a power outage; Mobile registered? | आता वीज जाणार असेल तर मिळणार मोबाइलवर सूचना; मोबाइल नोंदणी केली का?

आता वीज जाणार असेल तर मिळणार मोबाइलवर सूचना; मोबाइल नोंदणी केली का?

कुठे कराल नोंदणी?

कुठे कराल नोंदणी?

शेअर :

Join us
Join usNext

महावितरणकडे ग्राहकांनी मोबाइल नंबरची नोंदणी केल्यास आपल्याला बिलासंबंधी तसेच वीज पुरवठा केव्हा खंडित होणार, कधी पूर्ववत होणार आणि महत्त्वाचे वीज बिल भरण्याबाबत मोबाइलवर माहिती देण्यात येते. कोपरगाव शहर विभागात २४ हजार ६०४ ग्राहकांनी मोबाइल क्रमांक नोंद केला आहे.

२४ हजार ६०० ग्राहकांची मोबाइल क्रमांक नोंदणी

महावितरणच्या कोपरगाव शहर विभागात २५ हजार ४३९ एकूण ग्राहक आहेत. पैकी २४ हजार ६०४ वीज ग्राहकांनी आपल्या मोबाइल क्रमांकाची नोंद केली आहे.

महावितरण मोबाइल क्रमांक कसा नोंदवाल ?

महावितरण कंपनीची अधिकृत pro.mahadiscom.in/Consume rinfo/consumer.jsp या लिंकवर क्लिक करून ग्राहक स्वतः नोंदणी करू शकतात.

महावितरणने ग्राहकांच्या सोयी-सुविधांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्यापैकी एसएमएस ही योजना आहे. या सुविधेचा लाभ कोपरगाव शहर विभागातील जवळपास ९५ टक्के ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. उर्वरित ग्राहकांनीही आपले मोबाइल क्रमांक नोंदवावेत.- धनंजय धांडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कोपरगाव

एसएमएसवर मिळते सुविधा

  • वीज बिल किती? नोंदणीकृत एकूण २४ हजार ६०४ ग्राहकांना एसएमएस सुविधा देण्यात आली आहे. 

त्याद्वारे त्यांना वीज बिल किती आहे, याची माहिती दर महिन्याला दिली जाते. 

  • या वेळेत जाणार वीज- एसएमएसद्वारे मीटर रीडिंगची माहिती, लाइन बंद केव्हा होणार त्याबाबतची माहिती, वीज बिल भरण्याबाबतची माहिती आणि डिस्कनेक्शन नोटीस यांची माहिती दिली जाते.

Web Title: Notification will be given if there is a power outage; Mobile registered?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.