राज्यातील दारिद्र्यरेषेखालील रेषेखालील कुटुंबांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता सर्व शिधापारिका धारकांना पाच लाख रुपयांचा विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारकांना या योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळत असे. आता पांढरी शिधापत्रिकाधारक कुटुंबे तसेच कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांनाही या योजनेतून विमा संरक्षण मिळणार आहे. म्हणजेच राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांना विमा संरक्षण घेता येणार आहे.
दीड लाख रुपयांच्या विमा संरक्षणाची ही मर्यादा आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे. मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी या योजनेअंतर्गत उपचाराच्या खर्चाची मर्यादा प्रति रुग्ण अडीच लाखांवरून साडेचार लाख रुपये करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या २८ जून २०२३ रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असून त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे
महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील रुग्णालयांचा समावेश
महात्मा ज्योतीराव फुले जन अरोग्य योजना व अयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन अरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये रुग्णालयांची संख्या १००० एवढी आहे. ही योजना याअधीच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात लागू करुन सीमा लगतच्या महाराष्ट्रातील ८ जिल्हयात १४० व सीमेलगतच्या कर्नाटक राज्यातील ४ जिल्ह्यात १० अतिरिक्त रुग्णालये समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आहे. या व्यतिरिक्त २०० रुग्णालये यात सामील करण्यास मान्यता देण्यात आली आहे.