रब्बी पिके म्हणजे कमी पाण्याची पिके. ज्यात ज्वारी, बाजरी, आदी पिकांचा अधिक समावेश होतो. हंगाम चांगला राहिला पिकांना वेळेवर पाणी मिळाला तर धान्य मिळतं नाहीतर गुरांना चारा होतो या भावनेने शेतकरी ज्वारी बाजरी लागवड करतात.
मात्र फुलोरा झाला की कणीस भरणीच्या अवस्थेत या पिकांना पक्षी अधिक त्रास देतात. ज्यामुळे कणीसाचे नुकसान होते सोबत उत्पन्न कमी मिळते. असं होऊ नये म्हणून शेतकरी पूर्वी मचाण करायचे. अर्थात चार लाकडाचे खांब उभे करून त्यावर बसण्यायोग्य जागा करायचे. त्यानंतर त्यावर चढण्यासाठी शिडी लावली जायची व तिथून गोफण द्वारे खडे मारून पक्षि, रानडुक्कर, यांना पळवून लावले जायचे.
अलीकडे असं न करता आता शेतकरी वेगवेगळ्या रंगाच्या चमकणाऱ्या पट्टया पिकांच्या चारही बाजूने बांधतात ज्यामुळे त्या चमकल्या की पक्षी उडून जातात. मात्र यातून मोठे पक्षी, रानडुक्कर यांचे प्रतिबंध होत नाही.
यासाठी आम्ही आज आपल्याला एक भन्नाट उपाय सांगणार आहोत. या द्वारे तुम्ही शेतात न जाता, दिवस रात्र पिकांचे संरक्षण करू शकता. आणि ते सुधा अगदी अल्प खर्चात व घरच्या घरी.
काय आहे जुगाड
शेतात एक लाकडी खांब उभा करायचा. खांबावर पंखा (विना मोटर फक्त पाते आणि बेरिंग असलेला) लावायचा. त्या पंख्याला एक स्टीलचे ताट अन लाकूडाचा छोटासा तुकडा बांधायचा. यामुळे जसजसा पंखा वाऱ्याच्या मदतीने फिरेल तसाच लाकूड ताटावर आदळून आवाज करेल.