घराघरात फोडणीसाठी वापरला जाणारा जिऱ्याला आता चांगला भाव मिळण्याची चिन्हे आहेत. पावसाळी वातावरणामुळे जिऱ्याचे उत्पादन मर्यादित झाले असून जिऱ्याचा भाव काल बाजारात प्रति क्विंटल ६३ हजार ४०० रुपयांवर स्थिरावला. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही जिऱ्याच्या मागणीत वाढली असून देशात जिऱ्याचा साठा कमी आहे.
गुजरातमधील जीरा उत्पादक भागात तसेच राजस्थानमधील अलवार, जैसलमेर, जयपूर, बिकानेर आणि राज्यांच्या इतर भागात झालेल्या मुसळधार पावसाने जीरा पिकला मोठा फटका बसला. पावसाळी वातावरणामुळे जिऱ्याच्या उत्पादनामुळे घट होण्याचा अंदाज आहे. यंदा जिऱ्याची मागणी ४ लाख ५० हजार ते ५ लाख टनांपर्यंत राहू शकते. तर पुरवठा साडेतीन ते चार लाख टनांपर्यंत होऊ शकतो,असा अंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील इतर जिरा उत्पादक देशांमध्ये जिऱ्याचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे भारताकडे मागणी आहे.पण देशातही पुरवठा कमी असल्याने जिऱ्याचे भाव तेजीतच राहू शकतात,असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. नवीन जिऱ्याच्या आगमनापूर्वी चीन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतीय जिरे खरेदी करेल या शक्यतेमुळे बाजारातील गतिशीलतेमध्ये आणखी अनिश्चितता वाढली आहे.
एनसीडीईएक्सवर ऑगस्ट महिन्यात वायदे ५९५ रुपयांनी वाढले होते. ५७ हजार ३०५ रुपयांवर ते पोहोचले. वायद्यांमध्ये वाढ दिसली पण स्पॉट खरेदीत जिरा स्थिर होता. सध्या बाजारात जिऱ्याची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे दरात तेजी दिसून येत आहे. त्यामुळे मसाल्याच्या डब्यातला जीरा महागल्याचे चित्र आहे.