Join us

आता पीएफ काढणे होणार सोपे; युपीआयद्वारे तुमच्या मोबाईलवरच काढता येणार पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 18:12 IST

EPF UPI कर्मचारी भविष्य निधीची (ईपीएफ) रक्कम काढण्यासाठी आगामी तीन महिन्यांत युनायटेड पेमेंट इंटरफेसची (यूपीआय) सुविधा सुरू करण्याची तयारी कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) चालविली आहे.

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निधीची (ईपीएफ) रक्कम काढण्यासाठी आगामी तीन महिन्यांत युनायटेड पेमेंट इंटरफेसची (यूपीआय) सुविधा सुरू करण्याची तयारी कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) चालविली आहे.

ही व्यवस्था उभी राहिल्यानंतर कर्मचारी डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून आपला ईपीएफ काढू शकतील.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'ईपीएफ'च्या दाव्यांचा निपटारा जलद गतीने तसेच विना अडथळा व्हावा, यासाठी भारत सरकारने काही सुधारणा हाती घेतल्या असून, त्याअंतर्गत यूपीआयद्वारा ईपीएफ काढण्याची सुविधा निर्माण करण्यात येत आहे.

ईपीएफओने एक योजनाही त्यासाठी तयार केली आहे. यूपीआय व्यवस्थेत ईपीएफओला समाविष्ट केल्यामुळे ईपीएफओची कार्यक्षमता तर वाढेलच; पण ७.४ दशलक्ष सदस्यांना ईपीएफओची रक्कम मिळण्यात सुलभता होईल.

ईपीएफओ यूपीआयशी जोडून सरकार वित्तीय व्यवहार अधिक सुलभ आणि गतिमान करण्याचा प्रयत्न करीत आहे.

ईपीएफओने किती दावे निकाली काढले?वर्ष : दावे निकाली काढले : वितरित केलेली रक्कम.२४-२५ : ५ कोटी : २.०५ लाख कोटी.२३-२४ : ४.४५ कोटी : १.८२ लाख कोटी.

◼️ ८.९५ लाख दावे वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये प्रक्रिया करण्यात आले होते. त्यात पुढील वर्षी दुप्पट वाढ झाली आहे.◼️ १८.७० लाख दावे वित्त वर्ष २०२४-२५ मध्ये तीन दिवसांच्या आत प्रक्रिया करण्यात आले.

अधिक वाचा: Farmer Id : शेतकऱ्यांना दिले जाणारे फार्मर आयडी कशासाठी? काय होणार त्याचा फायदा? वाचा सविस्तर

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीमोबाइलकेंद्र सरकारसरकारकामगारनिधी