Join us

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्य पाक स्पर्धा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 14:23 IST

सर्व स्पर्धकांनी तयार केलेले तृणधान्य वर्गीय पौष्टिक पदार्थ यांचे सादरीकरण करण्यात आले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, खामगाव बीड यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष-२०२३ निमित्त पौष्टिक तृणधान्य पाक स्पर्धा शिरूर कासार येथे कालिका देवी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिप्ती पाटगावकर, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र तर प्रमुख पाहुणे म्हणून कालिकादेवी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. विश्वास कंधार होते. 

यावेळी एकूण २९ स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सर्व स्पर्धकांनी तयार केलेले तृणधान्य वर्गीय पौष्टिक पदार्थ यांचे सादरीकरण करण्यात आले.परीक्षकाकडून प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, व पाचव्या क्रमांकाचे नंबर काढून त्यांना बक्षीस आणि  प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. त्याच बरोबर इतर स्पर्धकांनी सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांना देखील प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती श्री राजेंद्र नेटके, तालुका कृषी अधिकारी ,शिरूर कासार यांची लाभली.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कालिकादेवी महाविद्यालयाचे गृह विज्ञान विभागाचे प्राध्यापिका डॉ चेतना डोंगरीवार,कृषी विभागाचे कृषी सहाय्यक सौ कविता ढाकणे तर नगरपंचायत सौ सातपुते मॅडम व कृषी विज्ञान केंद्र खामगाव चे शास्त्रज्ञ प्रा. किशोर जगताप,  प्रा. गणेश मंडलिक व डॉ. श्रीकृष्ण झगडे व कालिकादेवी महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व इतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

टॅग्स :पीकशेती