वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, खामगाव बीड यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष-२०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य पाक स्पर्धा पेंडगाव, जि बीड येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. अलका पवार होत्या. बीड जिल्ह्याचे आत्मा विभाग प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक श्री. चव्हाण, उपसरपंच सूजाता कोसले, पंचायत समिती सदस्य किशोर काळकूटे, उमेद चे जिल्हा व्यवस्थापक हितन कूरे, प्रभाग समन्वयक श्री युवराज गारदे, स्वयंसेवी संस्थेचे श्री राठोड आदी मान्यवर होते.
प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आहारामध्ये तृण धान्याचा वापर करणे गरजेचे आहे. आजच्या घडीस या प्रकारची तृणधान्ये लुप्त होत चालले आहेत म्हणून याचे महत्त्व ओळखून याचा वापर करावा असे आवाहन या प्रसंगी श्री. साळवे यांनी केले, तर कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी आपल्या मार्गदर्शनात तृणधान्य पिकांचे व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांचे महत्त्व सांगितले.
एकूण २३ स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सर्व स्पर्धकांनी तयार केलेले तृणधान्य वर्गीय पौष्टिक पदार्थांचे सादरीकरण केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक, डॉ दिप्ती पाटगावकर, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक सौ. थोरात, पेंडगाव स्कूल येथील मुख्य अध्यापिका सौ. उन्हवणे या होत्या.
स्पर्धेचे सादरीकरण पाहून परीक्षिकांनी या स्पर्धेतील प्रथम क्रमांक सौ. रत्नमाला गाडे, द्वितीय क्रमांक सौ. लोफीन शेख, तृतीय क्र. सौ. आशा काळकूटे , उत्तेजनार्थ कु. श्रुती काळकूटे व उषा भारती यांना देण्यात आला. विजेत्यांना तृण धान्याचे (मिलेट ) किट व प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. त्याच बरोबर इतर स्पर्धकांनी देखील सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांना तृण धान्याचे (मिलेट ) किट व प्रमाणपत्र वितरित करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, खामगाव चे शास्त्रज्ञ प्रा. किशोर जगताप, डॉ तूकेश सूरपाम व डॉ. श्रीकृष्ण झगडे व पेंडगाव ग्रामपंचायत चे सर्व ककर्मचारी वर्ग व ग्रामस्थ यांनी अथक परिश्रम घेतले.