पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या कार्यकाळासाठीच्या मंत्रिमंडळाची खाते वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ३० केंद्रीय मंत्री, पाच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि २० राज्यमंत्री यांना खातेवाटप जाहीर झाले आहे. यामध्ये दोन केंद्रीय मंत्री, एक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व तीन राज्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले असून यामुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री पदाचा, पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पदाचा, प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्री, रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री पदाचा कार्यभार, रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदाचा कार्यभार तर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
संपूर्ण मंत्रिमंडळाची यादीकेंद्रीय कॅबिनेट मंत्रीराजनाथ सिंह - संरक्षण मंत्रालयअमित शाह - गृह मंत्रालयअश्विनी वैष्णव - रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्रालयएस. जयशंकर - परराष्ट्र मंत्रालयनितीन गडकरी - परिवहन आणि रस्ते विकास मंत्रालयशिवराज सिंह चौहान - कृषी, पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्रालयमनोहर लाल खट्टर - ऊर्जा, शहरी विकास मंत्रालयसीआर पाटील - जलशक्ती मंत्रालयमनसुख मांडविया - कामगार मंत्रालयजेपी नड्डा - आरोग्य, रसायन आणि खते मंत्रालयललन सिंह - पंचायत राज आणि मत्स्य उत्पादन मंत्रालयडॉ. विरेंद्र कुमार - सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयचिराग पासवान - क्रीडा मंत्रालयकिरेन रिजिजू - संसदीय कार्य मंत्रालयअन्नपूर्णा देवी - महिला आणि बाल विकास मंत्रालयराम मोहन नायडू - नागरी उड्डाण मंत्रालयसर्वानंद सोनोवाल - जहाज बांधणी मंत्रालयज्युवेअल राम - आदिवासी कार्य मंत्रालयकिशन रेड्डी - कोळसा आणि खणन मंत्रालयनिर्मला सीतारामण - अर्थ मंत्रालयजीतन राम मांझी - सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयधर्मेंद्र प्रधान - शिक्षण मंत्रालयएचडी कुमार स्वामी - अवजड उद्योग मंत्रालयज्योतिरादित्य सिंधिया - टेलिकॉम मंत्रालयभूपेंद्र यादव - पर्यावरण मंत्रालयप्रल्हाद जोशी - ग्राहक संरक्षण मंत्रालयगजेंद्र शेखावत - कला, पर्यटन, सांस्कृतिक मंत्रालयपीयूष गोयल - वाणिज्य मंत्रालयहरदीप सिंह पुरी - पेट्रोलियम मंत्रालयगिरीराज सिंह - वस्त्रोद्योग मंत्रालय
स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीइंदरजित सिंग राव - सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन, नियोजन मंत्रालयजितेंद्र सिंह - विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पीएमओ कार्यालय, अॅटोमिक एनर्जी आणि अंतराळ विभागअर्जुन मेघवाल - विधी आणि न्याय, संसदीय कार्य मंत्रालयप्रतापराव जाधव - आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयजयंत चौधरी - कौशल्य, शिक्षण मंत्रालय
राज्यमंत्रीजतीन प्रसाद - वाणिज्य आणि उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयश्रीपाद नाईक - ऊर्जा मंत्रालयपंकज चौधरी - अर्थ मंत्रालयकृष्णा पाल - सहकार मंत्रालयरामदास आठवले - सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयरामनाथ ठाकूर - कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयनित्यानंद राय - गृह मंत्रालयअनुप्रिया पटेल - आरोग्य आणि कुटुंब विकास, रसायन आणि खते मंत्रालयव्ही. सोमण्णा - जलशक्ती आणि रेल्वे मंत्रालयडॉ. चंद्रशेखर पेमासानी - ग्रामीण विकास आणि दळणवळण मंत्रालयएसपी बघेल - मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय तसेच पंचायत राज मंत्रालयशोभा करंदलाजे - सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, कामगार आणि रोजगार मंत्रालयबीएल वर्मा - ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयअजय टमटा - परिवहन आणि रस्ते मंत्रालयहर्ष मल्होत्रा - परिवहन आणि रस्ते मंत्रालयशांतनू ठाकूर - जहाज बांधणी मंत्रालयरवनीत बिट्टू - अल्पसंख्याक मंत्रालयसुरेश गोपी - कला, पर्यटन, सांस्कृतिक मंत्रालयरक्षा खडसे - क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयमुरलीधर मोहोळ - सहकार आणि नागरी उड्डाण मंत्रालय