Join us

जुने दस्तऐवज आता केवळ एका क्लिकवर; भूमीअभिलेखचे झाले आधुनिकीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 3:16 PM

डिजिटल इंडिया भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत शेतकरी आणि नागरिकांसाठी ई-रेकॉर्डसप्रणाली सुरू करण्यात आली आहे. ज्यातून नागरिकांना शेतीविषयक विविध दस्ताऐवज आता एका क्लीकवर उपलब्ध होतील.

डिजिटल इंडिया भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत शेतकरी आणि नागरिकांसाठी ई-रेकॉर्डसप्रणाली सुरू करण्यात आली आहे. ज्यातून नागरिकांना शेतीविषयक विविध दस्ताऐवज आता एका क्लीकवर उपलब्ध होतील.

ई- रेकॉर्डस संग्रहित दस्तावेज प्रणालीमध्ये शेती संबंधित जुने दस्तावेज यात जुने सातबारा, फेरफार, पेरेपत्रक, हक्क नोंदी उतारा पाहणे आणि शोधण्यासाठी aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या लिंकवर जाऊन यूजर आयडी व पासवर्ड टाकून जिल्हा, तालुका, गाव व गट क्र. निवडून आपल्याशी संबंधित जुने दस्तावेज पाहता येतील.

तसेच शेतकरी आणि नागरिक, तसेच आपले सरकार केंद्र, बँक प्रतिनिधींकरिता ई-हक्क प्रणालीमध्ये शेतीजमीन बाबतीत ऑनलाइन फेरफार अर्ज दाखल करण्यासाठी pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin लिंकवर जाऊन आपला यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून विहित माहिती भरावी लागणार आहे.

यात एकूण ११ प्रकारच्या ऑनलाइन फेरफारकरिता अर्ज ई-हक्क प्रणालीवर करता येतील. यात ई-करार, बोजा चढविणे, गहाणखत, बोजा कमी करणे, वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, अपाक शेरा कमी करणे, एकुमें नोंद कमी करणे, विश्वस्ताचे नाव बदलणे, खातेदाराची माहिती भरणे, हस्तलिखित व संगणीकृत सातबारामधील तफावत दुरुस्ती करणे, मयत कुळाची वारस नोंद या सेवा असणार आहे.

अधिक माहितीसाठी तहसीलदार कार्यालय, मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालयाशी संपर्क करावा लागणार आहे.

हेही वाचा - Dasta Nondani: राज्यात या दिवशी होणार नाहीत जमिनीचे व्यवहार

टॅग्स :शेती क्षेत्रसरकारडिजिटलशेतकरीशेती