Join us

जुनं ते सोनं; मातीपासून बनवलेल्या पारंपरिक भांड्याकडे वाढतोय कल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 3:01 PM

आधुनिक काळात या मातीच्या वस्तू कालबाह्य होत गेल्या. त्याची जागा गॅस शेगडी, फ्रीज व तत्सम इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी घेतली. मात्र, कालांतराने अन्य धातूंपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू मानवी शरीरासाठी घातक असल्याची बाब समोर येत आहे.

मातीच्या चुली, माठ, पणत्या व इतर वस्तू हमखास वापरल्या जात असत. आधुनिक काळात या मातीच्या वस्तू कालबाह्य होत गेल्या. त्याची जागा गॅस शेगडी, फ्रीज व तत्सम इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी घेतली. मात्र, कालांतराने अन्य धातूंपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू मानवी शरीरासाठी घातक असल्याची बाब समोर येत आहे.

पुन्हा नागरिकांचा कल मातीपासून बनवलेल्या पारंपरिक वस्तूंकडे पाहायला मिळत आहे. मातीच्या चुलीवरचे जेवण, मिसळ, तसेच कुल्हडमधील चहाला मिळणारी वाढती पसंती व वाढता वापर पाहता कुंभारकाम व्यवसायाला नव्याने संजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. 

या व्यवसायात माती कच्चा मला म्हणून वापरली जाते यात शेतकरी तसा विचार करायला गेला तर मातीचे पैसे कमवू शकतात तसेच सद्य धरणातील गाळ काढणीचे काम सुरु आहे हा गाळ यापासून ही भांडी बनविली जातात, ह्यात उद्योजकीय संधी सुद्धा आहे.

शहरी नागरिकांना चुलीवरच्या जेवणाची भुरळ- चुलीवरचे जेवण शहरी भागात सर्रास मिळत नसल्याने अनेक हॉटेलच्यबाहेर चुलीवरचे जेवण मिळेल, अशी पाटी पाहायला मिळते.- शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घ्यायला आवडतो. चुलीवरचे जेवण, चुलीवरची मिसळ अशा पदार्थांची भुरळ अनेकांना पडते.- इतकेच नव्हे तर अगदी मातीच्या कुल्हडमधील चहा, कॉफी पिण्यालाही अनेकजण पसंती देतात. त्यामुळे मातीच्या चुलींना मागणी आहे.- कुणबी तसेच आगरी समाजात लग्नसमारंभातही चुलीची आवश्यकता भासते.

जुनं ते सोनं म्हणत वापर सुरू• काही वर्षांपूर्वी कुंभारकाम व्यवसायाला घरघर लागली होती. इतर धातूंपासून बनवलेल्या वस्तू वापरण्याचे प्रमाण वाढले होते. परंतु त्याचा वाढता वापर मानवी शरीरावर हळूहळू परिणामकारक दिसू लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. मातीपासून बनवलेल्या वस्तूही हळूहळू हद्दपार होऊ लागल्या होत्या.• पुन्हा एकदा जुने ते सोने म्हणत आधुनिक काळातदेखील लोकांना मातीच्या वस्तूंचे महत्त्व कळू लागल्याने याच वस्तूंकडे लोक आकर्षित होताना दिसत आहेत. मातीचे माठ, चुली, पणत्या, लग्नविधीसाठीच्या वस्तू अशा मातीच्या वस्तूंचा वापर वाढल्याचे कुंभारकाम करणाऱ्या नागरिकांनी सांगितले.• वापर वाढल्याने मागणीही वाढली आहे, त्यामुळे कुंभारकामाला पुन्हा नवसंजीवनी मिळेल अशी आशा या समाजातील व्यावसायिकांना आहे.

• मातीच्या चुली २५० ते ३०० रुपये.• चुलुंबा १०० ते १५० रुपये या दराने विक्री होतात.

वडिलोपार्जित या व्यवसायावरच आमच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह होत असून हा व्यवसाय मधल्या काळात लोप पावत चालला होता. मात्र, आता पुन्हा या व्यवसायाला संजीवनी मिळेल अशी आशा आहे. - वर्षा चिरनेरकर, माती वस्तू व्यवसायिक, कुंभार आळी, वाडा

टॅग्स :अन्नशेतकरीधरणपाणीव्यवसायमहिला