Lokmat Agro >शेतशिवार > दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनची बोळवण साडेचार हजारांवर

दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनची बोळवण साडेचार हजारांवर

On the eve of Diwali, sowing of soybeans is over four and a half thousand | दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनची बोळवण साडेचार हजारांवर

दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनची बोळवण साडेचार हजारांवर

उत्पादन घटले; भावही पडले....

उत्पादन घटले; भावही पडले....

शेअर :

Join us
Join usNext

दिवाळीच्या तोंडावर हिंगोली जिल्ह्यातील मोंढ्यात सोयाबीनची आवक वाढली आहे. परंतु, भाव मात्र ४ हजार ७०० रुपयांवर जात नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.

दीपावलीचा सण पाच दिवसांवर आला असून, या सणाची सर्वत्र तयार सुरु आहे. दिवाळीत आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यात येतात. प्रामुख्याने व्यापारीवर्ग दिवाळीच्या अगोदर उधारी वसुलीवर भर देतात. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत. ऑक्टोबरच्या तुलनेत मागील चार दिवसांपासून आवक जवळपास दुपटीने वाढली आहे. दररोज सरासरी १ हजार विक्रीसाठी येत समाधानकारक मिळत नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. ८०० ते २ हजार क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांचे सोयाबीन रस्त्यावर टाकून बिट पुकारावी लागली.

४ नोव्हेंबर रोजी येथील मोंढ्यात १ ८८० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. किमान ४ हजार ५०५ तर कमाल ४ हजार ९३० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. सोयाबीन पाच हजारांचा टप्पा ओलांडत नसल्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी पुढे येत आहे.

सोयाबीन टाकावे लागले रस्त्यावर

बाजार समितीच्या मोंढ्यात आवक वाढल्याने सोयाबीन टाकण्यासाठी टिनशेड अपुरे पडत आहे. त्यामुळे शनिवारी काही शेतकऱ्यांचे सोयाबीन रस्त्यावर टाकावे लागले. सकाळी ११ वाजेपर्यंत आलेल्या सोयाबीनला टिनशेडमध्ये जागा मिळाली, त्यानंतर मात्र मोंढा पूर्ण भरल्याने काही शेतकऱ्यांचे सोयाबीन रस्त्यावर टाकून बीट पुकरवी लागली.

  • पावसाचा लहरीपणा तसेच ऐन भरात असताना सोयाबीनवर येलो मोझॅकने हल्ला केला. त्यामुळे शेंगा परिपक्च होण्याआधीच वाळून गेल्या.

परिणामी, उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यातच बाजारात भावही कवडीमोल मिळत असल्याने यंदा सोयाबीन उत्पादक संकटात सापडले आहेत.

  • उत्पादन तर घटले आहेतच; आता भाव तरी समाधानकारक मिळावा, अशी अपेक्षा आहे.


तुरीची चमक वाढली....

शनिवारी मोड्यात ३० क्विटल तूर विक्रीसाठी आली होती. १० हजार ८०० ते ११ हजार ७०० रुपयांदरम्यान भाव मिळाला. गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन निम्म्याखाली आले होते. त्यामुळे समाधानकारक भाव मिळूनही फारसा लाभ होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: On the eve of Diwali, sowing of soybeans is over four and a half thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.