Lokmat Agro >शेतशिवार > चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर वांगे शंभरीपार, टोमॅटो गडगडला; इतर भाजीपाल्याचे भाव स्थीर

चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर वांगे शंभरीपार, टोमॅटो गडगडला; इतर भाजीपाल्याचे भाव स्थीर

On the occasion of Champashashti, the eggplants were overcrowded, the tomatoes thundered; Prices of other vegetables stable | चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर वांगे शंभरीपार, टोमॅटो गडगडला; इतर भाजीपाल्याचे भाव स्थीर

चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर वांगे शंभरीपार, टोमॅटो गडगडला; इतर भाजीपाल्याचे भाव स्थीर

चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याची मागणी वाढते. या मुहूर्तावर हिंगोलीच्या बाजारात वांग्याने चांगलाच भाव खाल्ला असून, एक किलो वांग्यासाठी ८० ते १२० ...

चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याची मागणी वाढते. या मुहूर्तावर हिंगोलीच्या बाजारात वांग्याने चांगलाच भाव खाल्ला असून, एक किलो वांग्यासाठी ८० ते १२० ...

शेअर :

Join us
Join usNext

चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याची मागणी वाढते. या मुहूर्तावर हिंगोलीच्या बाजारात वांग्याने चांगलाच भाव खाल्ला असून, एक किलो वांग्यासाठी ८० ते १२० रुपये मोजावे लागत आहेत. तर टोमॅटोचे भाव मात्र गडगडले असून, इतर भाजीपाल्याचे दर पंधरवड्यापासून स्थीर आहेत. जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी चंपाषष्ठी साजरी होत असून, या मुहूर्तावर खंडोबाची पूजा करण्यात येते. या दिवशी नैवैद्यात वांग्याच्या भरताचा समावेश केल्या जातो. त्यामुळे आदल्या दिवशी रविवारपासूनच हिंगोलीच्या भाजीमंडईत वांग्याला मागणी वाढल्याचे पहावयास मिळाले.

चार दिवसांपूर्वी ४० ते ५० रुपये - किलोने उपलब्ध होणाऱ्या वांग्यांनी चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर मात्र भाव न खाल्ला. रविवारी भाजीमंडईत वांग्याला ८० ते १२० रुपये किलोचा दर मिळाला. भाव कडाडल्याने नागरिकांनी वांगे खरेदी करताना हात आखडता घेतल्याचे भाजी विक्रेता अब्दुल मतीन यांनी सांगितले. 

कांदा, लसनाच्या पातीलाही आला भाव

वांग्याचे भरीत बनविताना त्यात कांद्याच्या पातीचा समावेश करण्यात येतो. त्यामुळे कांद्याच्या पातीचीही मागणी वाढली आहे. त्या तुलनेत मात्र आवक कमी असल्यामुळे चांगला भाव आला होता. एका जुडीसाठी १५ ते २० रुपये भाव मिळाला.

Web Title: On the occasion of Champashashti, the eggplants were overcrowded, the tomatoes thundered; Prices of other vegetables stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.