छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलतानाबाद (ता. गंगापूर) येथे दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव येथील कृषी कन्यांच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोमवार( दि.०१) वृक्ष लागवड करत व कृषी विषयक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुलतानाबाद गावातील जिल्हा परिषद शाळेतील परिसरात जांभूळ, सिताफळ, आंबा, कडुलिंब, चिंच, वड इत्यादी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गाव परिसरात कृषीकन्यांनी वृक्षदिंडी काढली.
या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. बैनाडे एस. एस, डॉ. कर्डिले पी. बी, कार्यक्रमाधिकारी प्रा. बडे एस. बी, प्रा. पगार ए. आर, प्रा. घुगे जी. व्ही आदींचे कृषी कन्यांना मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्र कृषीदिनाच्या निमित्ताने पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, सुलतानाबादचे सरपंच, उपसरपंच, पोलीस उपनिरीक्षक यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी कन्या अर्चना पिसाळ, तेजल भापकर, नयन लांडगे, प्रतीक्षा गरड, सलोनी पावरा, वैष्णवी काजे, स्नेहल बोराटे, शुभांगी डिके, गायत्री डुकरे, मेघा शेळके, ऋतुजा थोरात, ऐश्वर्या गाडेकर, साधना आल्हाट आदींनी परिश्रम घेत शेतकरी बांधवांना कृषी शिक्षणातील शैक्षणिक अपरिचित गोष्टींची ओळख करून दिली.